सहार विमानतळावरून  25 कोटींचे कोकेन जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - सहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेल्या कारवाईत 25 कोटींच्या कोकेनसह दोन परदेशी नागरिकांना बुधवारी (ता. 11) अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असून, ती देशातील कुख्यात ड्रग्स सिंडिकेटपैकी एक आहे. दोघेही ब्राझील ड्रग्स सिंडिकेटशी संबंधित आहेत. 

अटकेतील दोन्ही आरोपी पेरूचे नागरिक आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर रॅकेटशी संबंधित आहेत. दोघेही मुंबईतील डीलरकडे कोकेन देऊन परत जाणार होते. त्याबद्दल त्यांना चांगला मोबदला मिळणार होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पण त्या माहितीची आम्ही पडताळणी करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोघेही ब्राझीलहून आफ्रिका व आफ्रिकेहून मुंबईत दाखल झाले. याबाबतची माहिती एनसीबीला मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी विमानतळावरून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

छुप्या जागेत कोकेन 
35 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महिलेने त्यांच्यासोबतच्या बॅगेतील छुप्या जागेत 4.3 किलो उत्तम प्रतीचे कोकेन लपवून आणले होते. हे कोकेन साओ पोलो, ब्राझील येथून मुंबईत आणण्यात आले होते.

Web Title: 25 crores of cocaine seized from Sahar airport