"हनी ट्रॅप'ने घातला 25 लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

मुंबई - "हनी ट्रॅप'मध्ये दोनदा अडकवून पेडर रोड येथील व्यक्तीला 25 लाखांना फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोतया पोलिसांमार्फत छापे घालून या व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून हे पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी बॅंकेच्या सीसी टीव्हीच्या मदतीने चार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. मार्चमध्ये अनोळखी महिलेने त्यांना फोन करून अंधेरी स्थानकाजवळ एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. तेथून ते आंबोलीला गेले आणि त्याठिकाणी तोतया पोलिसांमार्फत छापा टाकून तक्रारदाराकडून वेळोवेळी पैसे उकळले. 

Web Title: 25 lakh cheating in mumbai