25 वर्षीय कैद्याचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

25 वर्षीय कैद्याचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे : ठाणे कारागृहात आठवड्याभरापूर्वी अपहरणाच्या गुन्ह्यात आणलेल्या 25 वर्षीय कैद्याने बरॅक क्रमांक 6 वर चढून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दीपक गुप्ता असे कैद्याचे नाव असून त्याला उपचारासाठी प्रथम ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात अपहरणाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी दीपक गुप्ता (25) हा 8 ते 10 दिवसांपूर्वी आला होता. बरॅक क्रमांक 6 मध्ये त्याला बंदी करून ठेवले होते.

सोमवारी सकाळी गुप्ता याने बरॅकच्या छतावर जाऊन खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुप्ता याला गंभीर इजा झाल्याने त्याला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने तात्काळ त्याची रवानगी उपचारासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती सिव्हिल रुग्णालयाच्या प्रशासनाने दिली. दरम्यान, कारागृह प्रशासनाच्या प्राथमिक चौकशीत कैदी दीपक गुप्ता हा मानसिक रोगी असल्याची माहिती समोर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com