चारकोपच्या खारफुटीत २५० किलो प्लास्टिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - कांदिवलीतील चारकोप परिसरातील खारफुटीतून प्लास्टिकचा २५० किलोहून अधिक कचरा गोळा करण्यात आला. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी), सेंट्रल गव्हर्न्मेंट लॉ एन्फोर्समेंट एजन्सी या संस्थेच्या वतीने सफाई करण्यात आली.

मुंबई - कांदिवलीतील चारकोप परिसरातील खारफुटीतून प्लास्टिकचा २५० किलोहून अधिक कचरा गोळा करण्यात आला. वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (डब्ल्यूसीसीबी), सेंट्रल गव्हर्न्मेंट लॉ एन्फोर्समेंट एजन्सी या संस्थेच्या वतीने सफाई करण्यात आली.

चारकोपमधील खारफुटीच्या जंगलात कचरा जाळणे, प्लास्टिकचा कचरा फेकणे असे प्रकार सर्रास सुरू होते. त्याबाबत स्थानिकांनीही अनेकदा तक्रार केली होती, परंतु खारफुटीच्या जंगलात सुरू असलेल्या या बेकायदा कामांबाबत कोणताही थांग लागत नव्हता. हा कचरा उचलण्यासाठी अखेर स्थानिक, पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला. डब्ल्यूसीसीबीच्या पुढाकाराने ४० स्वयंसेवक रविवारी सकाळपासून प्लास्टिकचा कचरा गोळा करीत होते. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत २५० किलो प्लास्टिकपासून खारफुटीचा परिसर मुक्त करण्यात आला.

केंद्रीय पर्यावण खात्याने या वर्षी ‘प्लास्टिक प्रदूषणाशी लढा’ ही संकल्पना राबवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आम्ही प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा ध्यास घेतला आहे. लवकरच प्लास्टिक मुक्तीबाबत अनेक उपक्रम राबवले जातील, असे डब्ल्यूसीसीबीचे स्वयंसेवक अंकित व्यास यांनी सांगितले.

खारफुटीच्या जंगलात सुरू असलेल्या या बेकायदा कामांबाबत कोणताही थांग लागत नव्हता. हा कचरा उचलण्यासाठी अखेर स्थानिक, पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला. डब्ल्यूसीसीबीच्या पुढाकाराने ४० स्वयंसेवक रविवारी सकाळपासून प्लास्टिकचा क खारफुटीच्या जंगलात सुरू असलेल्या या बेकायदा कामांबाबत कोणताही थांग लागत नव्हता. हा कचरा उचलण्यासाठी अखेर स्थानिक, पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला.

Web Title: 250 Kilo Plastic in Charkop