मुंबईत आलेले 26 पाकिस्तानी गेले कुठे?

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

नियमानुसार परदेशातून नागरिक भारतात वास्तव्यास आल्यास 24 तासांच्या आत त्याला सी फॉर्म भरणे आवश्यक असते. त्याला राहत असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती भरणे बंधनकारक असते.

मुंबई - मुंबईत वास्तव्यास असलेले 26 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याने सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाडून (एटीएस) शोध घेण्यात येत आहे. भारतात आल्यानंतर आवश्यक असणारा सी फॉर्म भरण्यासाठी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, एकही पाकिस्तानी नागरिकाने योग्य ती माहिती दिलेली नाही. गेल्या आठवड्यापासून ते बेपत्ता आहेत.

नियमानुसार परदेशातून नागरिक भारतात वास्तव्यास आल्यास 24 तासांच्या आत त्याला सी फॉर्म भरणे आवश्यक असते. त्याला राहत असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती भरणे बंधनकारक असते. याबाबतचे वृत्त ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयावर ताशेरे ओढण्यात आले. 

Web Title: 26 Pakistani nationals go missing in Mumbai