धार्मिक स्थळांची सुरक्षा कडक रेल्वेस्थानके वाऱ्यावर!

Mumbai-Sea
Mumbai-Sea

२६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला चढवल्यानंतर आजही शहरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांची सुरक्षा उघड्यावरच आहे. त्याउलट धार्मिक स्थळे आणि मॉलमध्ये काटेकोर सुरक्षा ठेवली जात असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले. चर्चगेट स्थानक वगळता मुंबईतील एकही स्थानक सुरक्षित नसल्याचे या पाहणीत आढळले आहे. चर्चगेटमध्ये प्रत्येक प्रवेशद्वारावर धातुशोधक यंत्र (मेटल डिटेक्‍टर) बसवण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीचा संशय आल्यास त्याच्याजवळील सामानाची तपासणी (स्कॅनिंग) करण्याचीही यंत्रणा उपलब्ध आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
३२ मेटल डिटेक्‍टर
३०२ सीसी टीव्ही
 लोकल स्थानकाच्या दरवाजातील मेटल डिटेक्‍टर चुकवून आत प्रवेश करणे शक्‍य. 
 तीन वाहने स्कॅनिंग तपासणी यंत्रे.
 बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या पिशव्यांची तपासणी करण्यासाठी तीन एक्‍स-रे उपकरणे.
 प्रवाशांची तपासणी करण्यासाठी जवानांकडे हातातील ३२ मेटल डिटेक्‍टर.

अंधेरी
१० एन्ट्री पॉईंट
० मेटल डिटेक्‍टर
वाहने थेट रेल्वेच्या पादचारी पुलापर्यंत जाऊ शकतात. त्यांच्यावर नियंत्रण नाही. 
 फलाटावरही पोलिस गस्तीचा अभाव.

दादर
मेटल डिटेक्‍टर बंदच 
बॅगांची तपासणी होत नाही 
 मेटल डिटेक्‍टरच्या परिसरातही सुरक्षा नाही. 
 रेल्वेस्थानकाबाहेरील फेरीवाल्यांमुळे होत असलेल्या गर्दीचे सुरक्षेला आव्हान

बोरिवली
मेटल डिटेक्‍टर
 प्रवेशद्वारांवर पोलिसांची नजर नाही. 
 सीसी टीव्ही आहेत. 

सिद्धिविनायक मंदिर
 स्वतंत्र पोलिस चौकी. 
 मुख्य प्रवेशद्वारावर भाविक आणि सामानाची तपासणी. 
 प्रवेशद्वाराबाहेर फेरीवाले, बेकायदा पार्किंग. 
 सीसी टीव्हीची यंत्रणा.

मुंबई सेंट्रल
 टर्मिनसवर जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी होते.
 लोकलने जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी नाही. 
 अनेक वेळा पोलिसही हजर नसतात.

मुंबादेवी मंदिर
 मंदिराच्या दोन्ही बाजूला पोलिस चौकी. 
 प्रवेशद्वाराशी चार सीसी टीव्ही. 
 प्रवेशद्वारावर तपासणीसाठी मेटल डिटेक्‍टर आणि सुरक्षा रक्षक. 
 संपूर्ण परिसरात १० सीसी टीव्ही. 

घाटकोपर
मेटल डिटेक्‍टर एकही नाही
 घाटकोपर रेल्वेस्थानकाबाहेर यापूर्वी बॉम्बस्फोट झाला आहे. त्यानंतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. 
 मेट्रोमुळे गर्दी वाढली, तरी फक्त सीसी टीव्ही बसवले.

महालक्ष्मी मंदिर
 दोन्ही प्रवेशद्वाराजवळ पोलिस तैनात. 
 परिसरात ६० सीसी टीव्ही. 
 मेटल डिटेक्‍टरने तपासणी. 
 बॅग तपासणी स्कॅनिंग मशीन. 

बधवार पार्क
(बधवार पार्कमधून दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचे साथीदार समुद्रमार्गे मुंबईत प्रवेशले होते.)
 येथे सागरी सुरक्षेकरिता चौकी.
 वॉच टॉवर, सीसी टीव्ही.
 जेट्टीवर पोलिसांची गस्त. 
 सागरी सुरक्षेकरिता असलेली बोट सध्या भंगारात.

कॅफे लिओपोल्ड
कुलाब्यातील परदेशी पाहुण्यांना आर्कषित करणारे हॉटेल लिओपोल्ड परदेशी पाहुणे मुंबईत आल्यावर हॉटेल लिओपोल्डला आवर्जून भेट देतात. ज्युईश, स्पॅनिशसह, लंडन, कॅनडा या देशांतील नागरिक हे लिओपोल्ड हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात येतात. याच हॉटेल्समध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. खास करून महिला परदेशी नागरिक मोठ्या संख्येने हॉटेलमध्ये येतात. आता हॉटेल्सच्या बाहेर दोन महिला सुरक्षारक्षक तैनात असतात. हॉटेल्समध्ये येणाऱ्यांची साहित्याची त्या तपासणी करतात. 

धोबी तलाव आणि कामा रुग्णालय गल्ली 
सीएसटी परिसरातील धोबी तलाव आणि कामा रुग्णालयाच्या गल्लीत दहशतवाद्यांनी त्या रात्री बेछूट गोळीबार केला होता. त्यात पोलिस अधिकाऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्याचप्रमाणे निरपराध महिलेचाही दहशतवाद्यांनी जीव घेतला. सध्या धोबी तलाव परिसरात विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते; तर काही अंतरावर मुंबई पोलिसांचे कार्यालय आहे. त्यामुळे पोलिसांच्या वाहनांची सतत ये-जा असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com