esakal | SPECIAL REPORT : 26/11 चा स्मृतीदीन आला की आठवतो CSMT वरचा आक्रोश आणि चेहऱ्यासमोरुन आजही कसाब जात नाही
sakal

बोलून बातमी शोधा

SPECIAL REPORT : 26/11 चा स्मृतीदीन आला की आठवतो CSMT वरचा आक्रोश आणि चेहऱ्यासमोरुन आजही कसाब जात नाही

आज छोटू नेहमीप्रमाणे CSMT वर चहा विकतो. लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती खालावली आहे. मात्र 26/11 चा स्मृतीदीन आला की त्याला CSMT वरचा आक्रोश आठवतो. त्याच्या चेहऱ्यासमोरुन आजही कसाब जात  नाही.

SPECIAL REPORT : 26/11 चा स्मृतीदीन आला की आठवतो CSMT वरचा आक्रोश आणि चेहऱ्यासमोरुन आजही कसाब जात नाही

sakal_logo
By
दिनेश चिलप मराठे/

मुंबई : गीतांजली एक्सप्रेसबरोबर 9:51 च्या ठोक्याला सुटली आणि अवघ्या एक मिनिटांनी  पाकिस्तानी दहशदवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथे AK 56 या अत्याधुनिक स्टेनगनने निष्पाप रेल्वे प्रवाश्यावर अंधांधूद गोळीबार केला. काही मिनीटात स्टेशनमध्ये प्रेतांचा खच पडला, रक्ताच्या थारोळ्यात अनेक जखमी लोक पडले होते. गोळीबाराचा आवाज सुरु होता. लोक सैरावैरा पळत होते. तेव्हा पंचविशी पार केलेल्या छोटू उर्फ मोहम्मद तौफिक शेख हा सेंट जॉर्ज हॉस्पीटलपुढे चहा विकत होता. त्याने गोळीबाराचा, प्रवाशांचा आक्रोश ऐकला आणि लागलीच रेल्वे टर्मिनल्समध्ये धाव घेतली. 

महत्त्वाची बातमी : "कसाबची साक्ष दिली तेव्हाच हे ठरवलं होतं", कसाबला ओळखणाऱ्या देविकाला व्हायचंय पोलिस

आतमध्ये शिरताच, स्टेनगनधारी दोनजण प्रवाशांवर अंधाधूद गोळ्या झाडताना त्याने पाहीले. मात्र तो घाबरला नाही. संपुर्ण ताकत एकवटत, छोटुने जीवाची पर्वा न करता,  रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना उचण्यास सुरुवात केली. कसाबने छोटूला बघीतले, शिव्या हासडल्या, त्याच्या दिशेने फायरसुध्दा  केलं, मात्र छोटू थोडक्यात बचावला. छोटू जखमींना उचलून  बाजूला सेंट जॉर्ज रुग्णालयात घेऊन जात होता. काही जणांना हातगाडीने तर काही जणांना उचलून ऊन गेला.

खाली पडलेल्या, हालचाली स्पष्टपणे जाणवत असलेल्या प्रवाशांना छोटू उचलत होता. अनेक जखमींना टॅक्सीत टाकलं. जखमींना नेता नेता आपले कपडे रक्ताने माखले, याचे भान छोटूला नव्हते. यातील आठ ते नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्या जखमीचे प्राण वाचवता आले नाही याचे शल्य छोटूच्या मनात कायम आहे. मात्र अनेकांचे प्राण वाचवता आले याचे समाधान घेऊनही तो जगतो आहे. 

धक्कादायक बातमी : "नोव्हेंबर महिन्यात शरद पवारांचा निरोप घेऊन २ बडे नेते वर्षावर गेले होते, निरोप होता राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास तयार आहे" - प्रियम गांधी मोदी

प्रत्येक माणसामध्ये एक सैनिक लपला असतो. अशा वेळी राष्ट्रासाठी काहीतरी करून जाण्याचा  विश्वास माझ्यामध्ये आला. मी मदत करु शकलो ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी आणि अविस्मरणीय बाब आहे असे छोटू चायवाला सांगतो. 

जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर छोटूने  सर्व पोलिस जवानाना चहा दिला. त्या काळरात्री छोटूमुळे सुखरूप बचावलेल्या व्यक्ती आणि त्याचे नातेवाईक आजही छोटूला भेटतात. प्राण वाचवल्याबद्दल छोटूचे आभार मानतात. या घटने नतंर छोटूच्या कामगीरीचे खूप कौतूक झाले. राज्यपालांनी त्याचा गौरव केला, लहान मोठे 27 पुरस्कार छोटू चायवाल्याला मिळाले.

आज छोटू नेहमीप्रमाणे CSMT वर चहा विकतो. लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती खालावली आहे. मात्र 26/11 चा स्मृतीदीन आला की त्याला CSMT वरचा आक्रोश आठवतो. त्याच्या चेहऱ्यासमोरुन आजही कसाब जात  नाही.

2611 mumbai terror attack story of chotu chaiwala who saved many wonded by ajmal kasab

loading image
go to top