ग्रामीण भागात न गेल्याने 27 डॉक्‍टर बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - ग्रामीण भागांत नियुक्ती झाल्यावर गैरहजर राहणाऱ्या डॉक्‍टरांवर पुन्हा कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. अशा 27 डॉक्‍टरांची यादी आरोग्य संचालनालयाने तयार केली आहे. लवकरच सरकारी आदेशाद्वारे हे जाहीर केले जाईल, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

ग्रामीण भागात सेवेत हजर न होणाऱ्या डॉक्‍टरांना पुन्हा संचालनालयाने संधी दिल्यावरही 27 डॉक्‍टरांनी प्रतिसाद दिला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 100 डॉक्‍टरांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतरही कारवाई सुरू ठेवणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले होते. मेपासून या गैरहजर राहणाऱ्या डॉक्‍टरांवर आरोग्य मंत्रालयाची नजर होती. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील दुर्गम भागांत डॉक्‍टर मोठ्या संख्येने गैरहजर राहत असल्याचे दिसून आल्यानंतर आरोग्य संचालनालयाने या डॉक्‍टरांची यादी तयार केली होती.

गैरहजर डॉक्‍टरांबाबत दोन वर्षांपूर्वी राज्य मानवी हक्क आयोगाने घेतलेल्या सुनावणीच्या वेळीही चर्चा झाली होती. त्या वेळी ग्रामीण भागांत डॉक्‍टर परत यावेत यासाठी कर्नाटकसारखी पद्धत अवलंबली जाणार असल्याचे आरोग्य संचालनालयाने आयोगाला सांगितले होते; मात्र ही पद्धत आरोग्य मंत्रालयाने नाकारली होती. उलट डॉक्‍टरांना पुढील परीक्षांसाठी जास्त गुण देऊन प्रोत्साहन देण्याचा आरोग्य मंत्रालयाचा विचार आहे.

Web Title: 27 doctor suspend