27 गाववासीय आक्रमक; प्रभाग कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

कल्याण : पालिका मुख्यालयावर काढलेल्या मार्चात सहभागी झालेले ग्रामस्थ (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)
कल्याण : पालिका मुख्यालयावर काढलेल्या मार्चात सहभागी झालेले ग्रामस्थ (छायाचित्र : ऋषिकेश चौधरी)

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत 27 गावांचा समावेश केल्याने तेथील विकास खुंटला आहे. त्यात पालिकेने मालमत्तांना कोणतेही निकष न लावता भरामसाठ करवाढ (घरपट्टी) केली आहे. हा जाचक कर येत्या दोन महिन्यात कमी न केल्यास पालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा 27 गावातील सर्वपक्षीय युवा मोर्च्याच्या वतीने देण्यात आला. 

पालिकेत समाविष्ट केलेली 27 गावे पुन्हा वगळून टाका आणि या गावात 10 पटीने वाढवलेला मालमत्ता कर कमी करा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या वतीने कृषी उपन्न बाजार समिती ते पालिका मुख्यालय असा धडक मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी "टॅक्‍स पावती' फाडून आपला निषेध नोंदवला. 

पालिका मुख्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने पालिका उपायुक्त मारुती खोडके यांना निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी 27 गावातील नगरसेवकांनी राजीनामा द्यावा, नगरसेवकांनी दोन महिन्यात राजीनामा न दिल्यास त्यांच्या घरावरही मोर्चा काढू, असा इशारा दिला. मोर्चात गजाजन पाटील, गणेश म्हात्रे, संतोष केणे, रवी पाटील, अर्जुन बुवा चौधरी, ऍड. भारद्वाज चौधरी, बबन महाराज, हनुमान महाराज यांच्यासह शेकडो तरुण, महिला सहभागी झाले होते. 

शिंदे म्हणजे जनरल डायर : गणेश म्हात्रे 
27 गावे पालिकेमधून वगळणे असे की, रस्ता रुंदीकरणाला होणारा विरोध, नेवाळीतील आंदोलन, आगरी समाजाचे आंदोलन चिरडण्यासाठी, समाजाला संपविण्यासाठी राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनरल डायरची भूमिका बजावल्याचा आरोप 27 गावातील नेते गणेश म्हात्रे यांनी केला. तसेच आगरी समाजाने जागे झाले पाहिजे, असे आवाहन करत त्यांच्या मागे फिरणाऱ्या आगरी समाजाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी आता त्यांच्या मागे फिरणे बंद करून समाजासाठी काम करण्याचे आवाहन म्हात्रे यांनी केले. 

अशीही समाजसेवा 
पालिका मुख्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना नाश्‍ता आणि पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले. नाश्‍ता करून झाल्यानंतर रस्त्यावर कचरा निर्माण झाला होता. मात्र, मोर्चा समाप्त झाल्यानंतर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन रस्ता साफ करत एक आगळी वेगळी समाजबांधिलकी दाखवली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com