27 गावांच्या विकासासाठी स्वतंत्र नगरपालिकेची गरज

रविंद्र खरात 
मंगळवार, 8 जानेवारी 2019

कल्याण  - कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूकीपूर्वी राज्य शासनाने 27 गावांचा समावेश केला. मात्र त्या गावातील विकास खुंटला आहे. त्या गावांची पुन्हा स्वतंत्र नगरपालिका करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार ता 8 जानेवारी रोजी कल्याण शिळफाटा रोड वरील टाटा पावर येथे रास्ता रोको आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी मानपाडा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडले. 

स्थानिक भूमीपुत्रांनी ग्रामपंचायत असताना बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम केली. मात्र 27 गावातील दस्त नोंदणी गेल्या 3 वर्षा पासून बंद ठेवण्यात आल्याने व्यावसायावर परिणाम झाला आहे. निवडणुकीत सहा हजार पाचशे कोटी रुपये विकास निधी द्या, दस्त नोंदणी बंद केली ती पुन्हा सुरू करा, 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करा अश्या मागण्या करत आज मंगळवार ता 8 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनमुळे कल्याण शिळफाटा रोड वर पाच ते दहा मिनिटे वाहनाची लांब लचक रांगा लागल्या. होणारी वाहतूक कोंडी पाहता आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी बाजूला घेतले, नेत्यांचे भाषणबाजी होताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना नंतर सोडून दिले. या आंदोलनमध्ये आमदार जगन्नाथ शिंदे, जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते, महेश तपासे, वंडार पाटील, सुधीर पाटील, अर्जुनबुवा चौधरी, गुलाब वझें, उमेश बोरगावकर, सारीका गायकवाड समवेत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

तर गावात बंदी 
27 गावांची स्वतंत्र नगर पालिका न केल्यास 27 गावात सत्ताधारी नेत्यांना गावात फिरकू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिला आहे.

अनेक वर्षे राज्यात सत्ता असल्याने स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना आंदोलनाची सवय नसल्याने नियोजित एक तास उशिरा आंदोलन सुरू झाले. तर आंदोलनमध्ये कार्यकर्त्यांना जमा करण्यासाठी पदाधिकारी वर्गाला चांगलाच घाम फुटला. रास्ता रोको आंदोलन केले मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आंदोलन आटोपते घेतले.

जोशात नेते ... आणि आंदोलनाचा विसर ..
27 गावांच्या मुद्द्यावर आंदोलन असताना मीडियाला प्रतिक्रिया देताना आमदार जगन्नाथ शिंदे म्हणाले की 36 गावाची समस्या तर रास्ता रोकोच्या ऐवजी रेल रोको आंदोलन केल्याचे यावेळी स्पष्ट केले यामुळे नेते किती गंभीर आहेत यावर चर्चा सुरू होती.

Web Title: 27 villages need for a separate Municipal Council for the development