28 सदस्य लढणार भाजपच्या चिन्हावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर - ओमी कलानी भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा थांबत नसतानाच त्यांना कमळाचा मोह आवरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उल्हासनगर महापालिका निवडणुकीत ओमीने भाजपशी हातमिळवणी केली असून, आपल्या शिलेदारांना कमळाच्या चिन्हावर लढविण्याचे पक्के केले आहे. या वृत्ताला टीम ओमी कलानीचे सदस्य मनोज लासी यांनी दुजोरा दिला आहे.

टीम ओमी कलानीचा स्वतंत्र पक्ष नाही. मात्र, भाजपशी जवळीक साधण्याच्या दृष्टीने आपले वेगळे अस्तित्व राखत त्यांनी घरोबा केला. त्यामुळे ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवितात, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. दरम्यान, त्यांनी रासप पक्षाला जवळ करत त्यातील आठ सदस्यांना नगाऱ्याच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यानुसार उमेदवारी अर्जही भरले आहेत. मात्र, टीममधील 28 सदस्य हे "कमळा'च्या चिन्हावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: 28 candidates will fight on BJP symbol