टिकमानी यांच्या कोलांटउड्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

ठाणे - पालिका निवडणुकीत ‘उमेदवारीसाठी काहीही’ अशी स्थिती ठाण्यातील अनेक इच्छुकांची झाली आहे. त्यातूनच राष्ट्रवादीवर टीका करत कोपरीतील नगरसेवक लक्ष्मण टिकमानी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु महिनाभरात शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे अशा प्रकारे शिवसेनेत प्रवेश केलेल्यांना भाजपने लक्ष्य केले असून काही नगरसेवक गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

पालिका निवडणुकीत युती तुटली आणि आता शिवसेना आणि भाजप हे स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे आता उमेदवारांची पळवापळवी जोरात सुरू आहे. त्यानुसार शिवसेनेने आतापर्यंत १७; तर भाजपनेसुद्धा तेवढेच नगरसेवक आपल्याकडे ओढले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवस शिल्लक असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत भाजप आता शिवसेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. त्याच व्यूहरचनेचा भाग टिकमानी यांचा प्रवेश मानला जात आहे.

औटघटकेचा प्रवेश
विशेष म्हणजे टिकमानी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळेस भरत चव्हाण यांनीसुद्धा भाजपत प्रवेश केला होता. परंतु हे दोघे आमने-सामने येत असल्याने भाजपमध्ये खेळी केली. चव्हाण यांच्या सोबतीला आता टिकमानी यांनासुद्धा पक्षात प्रवेश देऊन येथील वॉर्ड मजबूत केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे हा आता शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेतील तिकिटाबाबत साशंकता निर्माण झाल्याने टिकमानी यांनी भाजपची कास धरल्याची चर्चा आहे.