पांडवकडा धबधब्यावर 29 पर्यटकांना अटक

पांडवकडा धबधबा (संग्रहित छायाचित्र)
पांडवकडा धबधबा (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : बंदी असतानाही पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या 29 पर्यटकांना रविवारी (ता. 15) खारघर पोलिसांनी अटक केली. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्व पर्यटकांविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप राणे यांनी 'सकाळ'ला दिली.   

नवी मुंबईतील खारघर येथील पांडवकडा धबधबा पावसाळ्यात अतिशय धोकादायक मानला जातो. त्याठिकाणी गेल्या काही वर्षांत आठ ते दहा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तसेच धबधब्याखाली डोंगरावरील दगड डोक्‍यात पडल्याने अनेक पर्यटकांना प्राण गमवावे लागले.  त्यामुळे सुरक्षे्च्या कारणास्तव खारघर पोलिसांनी हे पावसाळी पर्यटनस्थळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. मात्र अनेक पर्यटक बंदी आदेश झुगारून पांडवकडा धबधब्यावर जात आहेत.

मागील आठवड्यातदेखील पांडवकडा येथे 25 पर्यटक अडकले होते. त्यावेळी खारघर पोलिसांनी जीव धोक्यात घालून त्यांची सुटका केली. तरीही पर्यटक तेथे जाण्याचे न थांबल्यामुळे खारघर पोलिसांनी कठोर भूमिका घेत रविवारी 29 पर्यटकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पर्यटकांनी धोकादायक पांडवकडा धबधब्यावर जाऊ नये, असे आवाहन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com