मुंबईतील 2,988 जण कोरोनामुक्त; तर दिवसभरात 1,791 कोरोनारुग्णांची भर

मिलिंद तांबे
Saturday, 17 October 2020

मुंबईत आज 1,791 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,40,339 झाली आहे. मुंबईत आज 47 रुग्णांचा मृत्यू झाला

मुंबई : मुंबईत आज 1,791 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,40,339 झाली आहे. मुंबईत आज 47 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 9,682 वर पोहोचला आहे. शहरात आज 2,988 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आतापर्यंत 2,08,099 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 86 टक्के इतका झाला आहे. 

दसऱ्यापासून जिम, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात 14,598 अतिजोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोव्हिड काळजी केंद्रात दाखल करण्यात येणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असून, आज कोव्हिड काळजी केंद्र 1 मध्ये 1,072 अतिजोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल झाले. मुंबईत 638 इमारती आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,511 इतकी आहे. 

गोयल मुंबईद्रोही असल्याचा भाकपचा आरोप; महिलांना लोकल प्रवास नाकारल्याने गंभीर प्रतिक्रिया

मुंबईत आज नोंद झालेल्या 47 मृत्यूंपैकी 38 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 29 पुरुष; तर 18 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 47 रुग्णांपैकी नऊ रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते; तर 38 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते. आज 2,988 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत 2,08,099 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 86 दिवसांवर गेला आहे; तर 16 ऑक्‍टोबरपर्यंत एकूण 13,40,767 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या; तर 10 ऑक्‍टोबर ते 16 ऑक्‍टोबरदरम्यान कोव्हिड रुग्णवाढीचा दर 0.81 इतका आहे. 
 

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2988 coroners released in Mumbai An increase of 1,791 coronary patients per day

टॉपिकस