पोलीस ठाण्यात पोलीसाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

कळवा : राहत्या इमारतीचा वाद कोर्टात दावा प्रलंबित आसताना मुंब्रा पोलिसांनी मदत मागायला आलेल्या इसमास समजावून सांगणाऱ्या पोलीस हवालदारावर हल्ला करणाऱ्या व त्याचा गणवेश फाडणाऱ्या तिघा तरुणांना मुंब्रा पोलिसांनी रविवार (दि 13)ला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

मुंब्रा शैलेशनगर मध्ये बिल्डिंग क्रमांक 17 मध्ये सध्या जागेवरून वाद सुरू असून त्या वादाचा दावा कोर्ट प्रलंबित आहे. या संदर्भात रविवारी (ता. 13) रात्री एकच्या सुमारास फिरोज युसुफ खान (वय 43) हा मुंब्रा पोलिसांकडे इमारतीत वाद झाला असून मदत मागण्यासाठी आला होता, म्हणून रात्री पोलीस ठाण्यात कर्तव्यवर असलेले पोलिस हवालदार माऊली प्रभाकर बिरादार यांनी त्या परिसरात ड्युटी वर असलेल्या बिट मार्शलला फोन करून घरी जाऊन वाद मिटवून मदत करण्यासाठी सांगितले व हे वादाचे प्रकरणाचा दावा कोर्टात प्रलंबित आसल्याचे फिरोजला समजावले व उद्या यावर चर्चा करू व त्यास घरी जाण्यास सांगितले आसता या गोष्टीचा राग येऊन त्याने मोबाइल वरून फोन करून आपले नातेवाईक मोझम खान (वय 41) व अरबाज खान (वय 40) यांना बोलावले या तिघांनी पोलीस ठाण्याच्या मोकळ्या जागेत हवालदार बिरादार यांना शिवीगाळ करून त्यांचा पोलीस गणवेश फाडला व कॉलर पकडून लाथा बुक्यांनी मारहाण केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी फिरोज सह मोझम व अरबाज या तिघांना अटक केली असून या संदर्भातील पुढील तपास कारीत आहेत

Web Title: 3 arrested for fight with police in police station