मुंबईत 'या' ठिकाणी उभारणार 300 खाटांचे विलगीकरण केंद्र

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईतील आरोग्यविषयक उपाययोजनांचा बुधवारी आढावा घेतला.

मालाड : 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईतील आरोग्यविषयक उपाययोजनांचा बुधवारी आढावा घेतला. तसेच वरळी रेसकोर्स तिनशे खाटांच्या विलगिकरण केंद्राची उभारणीही करण्यात येत असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.

नक्की वाचा : महाविकासआघाडीतल्या मंत्र्यालाच शिवसेनेकडून 'हा' खोचक सल्ला

यावेळी त्यांनी एनएससीआय वरळी डोम येथील पाचशे खाटांच्या विलगीकरण कक्षास तसेच एमएमआरडीए माध्यमातून वांद्रे कुर्ला संकुल येथे उभ्या राहत असलेल्या एक हजार खाटांच्या कोविड रुग्णालयास व वरळी रेस कोर्सवर उभ्या राहत असलेल्या अलगिकरण कक्षास भेट देऊन पाहणी केली. या आढावा दौऱ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त इक्बाल सिंग चहल हे देखील उपस्थित होते. 

हे वाचलत का  : अनेकांना जे जमत नाही ते 'या' तीन वर्षांच्या कबीरने केलं, पोलिसांनाही वाटलं लै भारी

अस्लम शेख यांनी सांगितले की, वांद्रे- कुर्ला संकुल येथे उभ्या राहिलेल्या एक हजार खाटांच्या कोविड रुग्णालय व एनएससीआय डोम येथील विलगिकरण कक्षाच्या धर्तीवर वरळी रेस कोर्सवर देखील तीनशे खाटांच्या विलगिकरण केंद्राची उभारणीही करण्यात येत आहे. तसेच एनएससीआय परिसरात लवकरच 40 खाटांचा कोविड - 19 अतिदक्षता विभाग देखील सुरु होणार आहे. 

महत्वाची बातमी मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत अमोल कोल्हेंनी राज्य सरकारकडे केली 'ही' मागणी 

विलगिकरण कक्ष व मॉड्युलर रुग्णालये यांच्या माध्यमातून कोरोना महामारीला आटोक्यात कसं आणता येईल या अनुशंगाने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.

 A 300-bed quarantine center will be set up at Worli Racecourse


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A 300-bed quarantine center will be set up at Worli Racecourse