'आमची वसई' आणि महाराष्ट्र पोलीसांकडून 3000 वृक्षांचे रोपण!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

वसई : वृक्षारोपणाच्या सामूहिक कार्याला पुढे नेत 'आमची वसई' या संस्थेने वनविभाग आणि पोलीस दल यांनी संयुक्तपणे केळवे रोड पूर्व येथे 1 जुलै रोजी वृक्षारोपण पार केले. यावेळी 3,000 वृक्षांचे रोपण करण्यात आले. अनेक नागरिकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. या वृक्षारोपण अभियानात औदुंबर, पिंपळ, कडुलिंब, कदंब, कंचन, जांभूळ, करंज, खैर, बहावा, सुपारी, सिताफळ, करंज, आवळा आणि विविध प्रकारच्या फळे आणि औषधी रोपांची लागवड करण्यात आली.  

या अभियानात धर्मसभा, ग्रीन अंब्रेला, राज्य सरकार महामित्र , रुग्णमित्र संस्था, नरवीर चिमाजी आप्पा प्रतिष्ठान, बाबासाहेब आंबेडकर कॉलेज-वसई इत्यादी संस्थांचे कार्यकर्ते व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर कार्यक्रमास आमची वसई अध्यक्ष हृषीकेश वैद्य, वन निरीक्षक संखे, वन उपनिरिक्षक मसके, धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 3000 tree plantation from aamchi wasai and maharashtra police