जळगावच्या भोंदूबाबाचा 32 लाखाला गंडा

करणी झाल्याचे सांगत केली फसवणूक
bhondu baba
bhondu babasakal

डोंबिवली:माझ्या अंगात सप्तश्रृंगी माता संचारते तुमच्या कुटूंबावर करनी केली असून ती करनी काढण्याच्या नावाखाली जळगावच्या एका भोंदूबाबाने दोन महिलांना तब्बल 32 लाख 15 हजाराला गंडा घातल्याची घटना उघड झाली आहे. जळगाव(jalgavi) येथील पवन पाटील (वय 28) असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याच्या विरोधात डोंबिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कळवा येथे राहणाऱ्या प्रियंका राणे यांची आई डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरातील ओम साई सोसायटीमध्ये रहाते.

bhondu baba
जळगाव : खासदार उन्मेश पाटलांबद्दल मध्यरात्री रेखाटला आक्षेपार्ह मजकूर

जळगाव येथे राहणाऱ्या पवन याने प्रियंका, त्यांची आई व भावास त्याचे अंगात इच्छामाता, सप्तश्रृंगी देवी संचारत असल्याचे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःच्या हातामधून त्याने खडीसाखर, कुंकू व त्यामध्ये देवीची चांदीची प्रतिमा काढून दाखविली. यामुळे प्रियंका व त्यांच्या आई भावाचा पवनवर विश्वास बसला. त्यानंतर पवनने तुमच्या कुटूंबावर कोणीतरी करनी केली असल्याची भिती यांच्या मनात घातली. ही करनी काढण्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगत प्रियंका व त्यांच्या आईच्या खात्यातून 31 लाख 6 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या खात्यात वळते करुन घेतले.

bhondu baba
जळगाव : खासदार उन्मेश पाटलांबद्दल मध्यरात्री रेखाटला आक्षेपार्ह मजकूर

तसेच प्रियंका यांच्याकडून 1 लाख 9 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तू देखील घेतल्या. डिसेंबर 2019 पासून हा सर्व प्रकार सुरु होता. अखेर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच प्रियंका यांनी शुक्रवारी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत पवन पाटील याने 32 लाख 15 हजार रुपयांना फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.

रामनगर पोलिस ठाण्यात पवन याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पोलिस निरिक्षक सुरेश सरडे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com