विमानाच्या शौचालयात 33 लाखांचे सोने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अबुधाबी येथून आलेल्या विमानाच्या शौचालयात बुधवारी (ता. 19) तब्बल 33 लाखांचे सोने सापडले. एअर इंटेलिजन्स युनिटने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान पुढे देशातील दुसऱ्या विमानतळावर जाणार होते. त्या वेळी स्थानिक प्रवासी बसण्यापूर्वीच शौचालयाची तपासणी करीत असताना सोने सापडले. अनेक वेळा आखाती देशातून प्रवास करणारे तस्कर मुंबईत उतरण्यापूर्वी शौचालयात सोने लपवतात. त्यानंतर देशांतर्गत दुसऱ्या विमानतळावर जाणाऱ्या विमानामध्ये त्यांचे सहकारी मुंबईतून बसतात आणि ते सोने कमी सुरक्षा असलेल्या विमानतळावर उतरवतात.
Web Title: 33 lakh rupees gold in plane toilet