मुंबई कोसळतेय... खरंच, हे वाचा; मग समजेल!

मिलिंद तांबे 
शनिवार, 29 जून 2019

मुंबईत गेल्या सहा वर्षात तब्बल 3323 इमारतींचे भाग कोसळून किंवा भिंती कोसळून 249 लोकांचा बळी गेला असून 919 जण जखमी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.

मुंबई : पुण्यात पावसाच्या सुरुवातीलाच भिंत कोसळून सुमारे 15 जणांचा मृत्यू झाल्याने पावसाळ्यात जुन्या इमारती किंवा भिंती कोसळून झालेल्या दुर्घटना आणि मृत्यू यांची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत अशाप्रकारे गेल्या सहा वर्षात तब्बल 3323 इमारतींचे भाग कोसळून किंवा भिंती कोसळून 249 लोकांचा बळी गेला असून 919 जण जखमी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला 2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहे. तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती जखमी झाले आहेत, याबाबत माहिती आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा सहाय्यक अभियंता सुनील जाधव यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिली.

Mumbai Rains : मुसळधार पावसामुळे मुंबईत पडझड

माहितीप्रमाणे सन 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 3323 घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.यात एकूण 249 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 919 लोक दुर्घटनेत जखमी झाले आहे. 

वर्षाप्रमाणे आकडेवारी

2013 मध्ये एकूण 531 घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याचा घटना घडल्या आहेत. यात एकूण 101 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 58 पुरुष आणि 43 स्त्रियांचा समावेश आहे तर 183 लोक जखमी झाले असून त्यात 110 पुरुष आणि 73 स्त्रियांचा समावेश आहे. 

2014 मध्ये एकूण 343 घर, घरांचे भाग, भिंती,इमारती,  इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात एकूण 21 लोकांचा मृत्यू झाला असून यात 17 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे तर 100 लोक जखमी झाले असून त्यात 62 पुरुष आणि 38 स्त्रियांचा समावेश आहे. 

Image result for mumbai old buildings

2015 मध्ये एकूण 417 घर, घरांचे भाग, भिंती,इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याचा घटना घडल्या आहेत. यात एकूण 15 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 11 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे तर 120 लोक जखमी झाले असून त्यात 79 पुरुष आणि 41 स्त्रियांचा समावेश आहे. 

2016 मध्ये एकूण 486 घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याचा घटना घडल्या आहेत. यात एकूण 24 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 17 पुरुष आणि 7 स्त्रियांचा समावेश आहे तर 172 लोक जखमी झाले असून त्यात 113 पुरुष आणि 59 स्त्रियांचा समावेश आहे. 

2017 मध्ये एकूण 568  घर,घरांचे भाग,भिंती,इमारती,इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.यात एकूण 66 लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात 44 पुरुष आणि 22 स्त्रियांचा समावेश आहे. तर 165 लोक जखमी झाले असून त्यात 101 पुरुष आणि 64 स्त्रियांचा समावेश आहे. 

2018 मध्ये एकूण 619  घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना आहेत. यात एकूण 15 लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात 12 पुरुष आणि 3 स्त्रियांचा समावेश आहे. तर 79 लोक जखमी झाले असून त्यात 60 पुरुष आणि 19 स्त्रियांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3323 buildings collapsed In past 6 years in Mumbai