‘बाजारात लवकरच ३५ लाख पिशव्या’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - प्लॅस्टिकबंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून, लवकरच ३५ लाख कापडी पिशव्या बाजारात येतील. त्याचबरोबर २५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी सांगितले.

पर्यावरण विभागाने घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगताना कदम म्हणाले, ‘‘ प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय देण्यासाठी लवकरच ३५ लाख कापडी पिशव्या बाजारात येणार आहेत. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला ५ कोटी रुपये देणार आहोत. देशातील बरीच राज्ये महाराष्ट्राचा प्लॅस्टिकबंदीचा निर्णय राबविण्यासाठी पुढे आली आहेत. राज्यातील २५ नद्यांचे संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्या ५०० कंपन्या बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातील पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी पर्यावरण विभाग कटिबद्ध आहे.

Web Title: 35 Lakh Cloth Bag in Market