डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या खर्चात 370 कोटींची वाढ; एमएमआरडीएच्या बैठकित मान्यता

तेजस वाघमारे
Sunday, 30 August 2020

भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल स्मारकाची उंची वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे स्मारकाच्या खर्चात 370 कोटींची वाढ झाली आहे

मुंबई : भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील इंदू मिल स्मारकाची उंची वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे स्मारकाच्या खर्चात 370 कोटींची वाढ झाली आहे. या खर्चाला एमएमआरडीएच्या जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. हा खर्च एमएमआरडीएच्या तिजोरीतून केला जाणार असून राज्य सरकारकडून त्याची प्रतिपूर्ती केली जाणार आहे.

मोठी बातमी! मुंबई, पुणे वगळता इतर विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा अशक्य; कुलगुरूंच्या समितीचा अहवाल सादर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2015 रोजी या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. निविदा प्रक्रियेनुसार शापूरजी पालनजी या कंपनीची नियुक्ती करून 9 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांना कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. त्यानंतर गेल्या वर्षी स्मारकाची उंची 350 फुटांवरून 450 फूट करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी स्मारकाचे पुनर्नियोजन करून संरचनात्मक रचनाही बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकाचे आयुर्मान 100 वर्षे असल्याने तसेच समुद्रकिनाऱ्यामुळे त्याचे परिणाम लक्षात घेऊन खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार अंदाजपत्रकीय किंमत  709 कोटींवरून 1079 कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे.  7 जुलै रोजी झालेल्या या बैठकीचे इतिवृत्त नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 370 crore increase in cost of dr Babasaheb Ambedkar Memorial; Meeting approval of MMRDA