
Mumbai Municipal : कोरोना नियंत्रणासाठीच्या खर्चाची 3899 कोटी रक्कम द्या; पालिकेचे राज्य सरकारला साकडे
मुंबई - कोरोना महामारी रोखण्यात पालिकेला यश आले. प्रतिबंधात्मक उपायोजनांसाठी पालिकेने आपल्या उत्पन्नातून 3899 कोटी रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मिळावी असे साकडे पालिका प्रशासनाने राज्य सरकारला घातले आहे.
नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आले. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्या तरी भविष्यात हो रोग वाढल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोरोना काळात गेल्यावर्षीच्या जून महिन्यापर्यंत पालिकेने आपल्या निधीतून कोरोना नियंत्रणासाठी पैसा खर्च केला. मुंबई शहर जिल्हाधिकारी तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी पालिकेची खर्च झालेली रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
कोरोना अजूनही पूर्णपे संपलेला नाही. कोरोनाचे रुग्ण दररोज आढळत आहेत. कोरोनासाठीचा हा निधी मिळाल्यास भविष्यात कोरोनाचा प्रसार वाढल्यास त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सोईचे होईल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.