बॅंका चार दिवस बंद राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - सलग आलेल्या सार्वजनिक सुट्या आणि चौथा शनिवार यामुळे या आठवड्याच्या अखेरपासून बॅंका चार दिवस बंद राहणार आहेत.

मुंबई - सलग आलेल्या सार्वजनिक सुट्या आणि चौथा शनिवार यामुळे या आठवड्याच्या अखेरपासून बॅंका चार दिवस बंद राहणार आहेत.

येत्या शनिवारपासून (ता. 28) मंगळवारपर्यंत (ता. 1) सलग चार दिवस बॅंका बंद राहणार आहेत. सुट्यांचा हंगाम आणि रोकड टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना पुढील दोन दिवसांत बॅंकांची कामे उरकावी लागणार आहेत. आठवड्यातील चौथा शनिवार असल्याने बॅंका 28 एप्रिल रोजी बंद राहतील. त्यानंतर रविवार (ता. 29), सोमवारी (ता. 30) बुद्ध पौर्णिमा आणि मंगळवारी (ता. 1) महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुटी असल्याने बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे.

Web Title: 4 days bank close