नालासोपाऱ्यातील चौघे केळवे समुद्रात बुडाले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पालघर - केळवे समुद्र किनाऱ्यावरील दादरा पाडा या धोकादायक ठिकाणी पोहण्यास उतरलेल्या नालासोपारा येथील चौघाजणांना जलसमाधी मिळाली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून, सायंकाळी उशिरापर्यंत तिघांचा शोध सुरू होता. नालासोपारा येथील संतोष भुवन परिसरातील दीपक परशुराम चलवादी (वय 20), दीपेश दिलीप पेडणेकर, गौरव भिकाजी सावंत, संकेत सचिन जोगले (तिघेही वय 17), देविदास रमेश जाधव (16), श्रीतेज नाईक आणि तुषार चिपटे (दोघेही वय 15) पर्यटनासाठी केळवे समुद्रकिनारी गेले होते. दुपारी 2.30 वाजता यापैकी चौघे समुद्रात पोहण्यासाठी उतरले; मात्र त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या भोवऱ्याची माहिती नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे बुडू लागले. हे पाहताच किनाऱ्यावर थांबलेल्या त्यांच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला; मात्र जीवरक्षक वेळेत न पोचल्याने चौघे समुद्रात बुडाले.
Web Title: 4 drown in kelave sea