नालासोपाऱ्यात ४ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त, क्राईम ब्रांन्चची कारवाई

नालासोपाऱ्यात  ४ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त, क्राईम ब्रांन्चची कारवाई

मुंबईः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा पूर्व प्रगती नगर येथे परिमंडळ 03 च्या क्राईम ब्रँचने छापा मारला आहे. या छापेमारी दरम्यान 4 लाख रुपये किंमतीचा एमडी ड्रग्स साठा जप्त केला आहे. या कारवाईत 2 महिलांना पोलिसांनी अटक केली. याबाबत तुलिंज पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

नाकेजु कहोमा डेव्हीड साराह (27) आणि नाबाटेरी शमीम कान्हाकुलीया सेझी (35) असे अटक महिला आरोपीचे नाव आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी झोन निहाय कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेगवेगळे स्वतंत्र पथक तयार केले आहेत.

नालासोपारा पूर्व प्रगती नगर येथील 90 फिट रोडवर दोन महिला अंमली पदार्थ घेऊन 30 डिसेंबरला संध्याकाळच्या सुमारास  येणार असल्याची माहिती  परिमंडळ 03 च्या क्राईम ब्रांन्चला गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहिती वरून छापा मारला असता दोन महिला संशयित रित्या आढळून आल्या. त्यांची चौकशी केली त्यांच्याकडे 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचा 220 ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आले आहे. दोन्ही महिलांना अंमली पदार्थसह ताब्यात घेऊन त्यांच्यावर तुलिंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

4 lakh MD Narcotic seized Nalasopara action Crime Branch two womens arrested

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com