बळी गेलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत 

दिनेश गोगी
रविवार, 15 जुलै 2018

उल्हासनगर : मुसळधार पावसामुळे वडोल गावात असलेल्या मलनिस्सारण केंद्राची संरक्षक भिंत कोसळून त्याखाली एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचा बळी गेल्याची घटना 25 जून रोजी घडली होती. या विद्यार्थ्याच्या परिवाराला शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी यासाठी स्थानिक टीम ओमी कलानी गटातील नगरसेविका सविता तोरणे-रगडे, अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे यांनी तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे केली होती. या मागणीला यश मिळाले असून नायब तहसीलदारांनी विद्यार्थ्याच्या परिवाराकडे 4 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत असले तरी तरी सर्व नागरी सुविधा ह्या उल्हासनगर महानगरपालिकाच्या वतीने पुरवल्या जात असलेल्या वडोल गावात अंबरनाथ नगरपरिषदेचे मलनिस्सारण केंद्र आहे. या मलनिस्सारण केंद्राच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधलेली आहे. भिंतीला लागूनच अनेक झोपडया बांधलेल्या आहेत. 23 व 24 जूनला रात्रीपासून अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात जोरदार पाऊस पडल्याने 25 तारखेच्या मध्यरात्री संरक्षक भिंत कोसळली आणि बाजूला असलेल्या झोपडीवर पडली. या घटनेत किरण घायवाट (वय 15) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचे काका सूर्यकांत घायवाट व अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले होते. त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

ही घटना समजताच उल्हासनगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, पाणी पुरवठा अभियंता कलाई सेलवन, मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके, अशोका फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मलनिस्सारण केंद्राची घरावर कोसळलेली भिंत बाजूला केली. किरणच्या वडिल चंद्रकांत यांचे निधन झालेले असल्याने त्याचे काका चंद्रकांत हे किरणचा सांभाळ करत होते. तेंव्हा किरणच्या मृत्यूबद्दल नुकसान भरपाईच्या रूपात त्याच्या नातलगांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सविता तोरणे-रगडे, शिवाजी रगडे यांनी तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे केल्यानुसार नायब तहसिलदार सुखदेव गवई, लिपिक संजय पवार यांनी किरणच्या परिवाराकडे 4 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी रगडे भाऊ बहिणी सोबत फिरोज खान, शालीनी गायकवाड, रेखा जाधव, स्वप्निल सावंत उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 lakhs of help to the victim's family