कामगार रुग्णालयातील चौघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - अंधेरीतील कामगार रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात कंत्राटदार, पर्यवेक्षक आणि एसी तंत्रज्ञाचा समावेश आहे. हलगर्जी आणि सुरक्षेची जबाबदारी न घेतल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे; मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

कामगार रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर 142 जण जखमी झाले होते. रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. दुर्घटनेनंतर राजकीय नेत्यांनी रुग्णालयाची पाहणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. जखमींचे जबाब नोंदवण्याकरता एमआयडीसी पोलिसांनी आठ पथक तयार केली होती. त्यांनी आतापर्यंत 170 जणांचे जबाब नोंदवले. त्यात जखमी, त्यांचे नातेवाईक, प्रत्यक्षदर्शी, बचाव पथक, रुग्णालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे. मंगळवारी (ता. 18) कलिनातील न्यायसहायक प्रयोगशाळेच्या पथकाने रुग्णालयाची पाहणी केली होती. घटनास्थळाहून काही नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेच्या शास्त्रज्ञांनी घेतले आहेत. त्या नमुन्याच्या तपासणीनंतर नेमके आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.

मृतांचा आकडा नऊ
आगीत जखमी झालेल्या शीला मुर्वेकर (65) यांचा बुधवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या नऊवर पोहचली आहे. दुर्घटनेत मुर्वेकर यांच्यासह सहा वृद्धांचा मृत्यू झाला.

Web Title: 4 People Crime by Hospital Fire