दरोड्याच्या तयारीतील चौघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

कर्जत - दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गावठी पिस्तुलासह पोलिसांनी गुरुवारी (ता. 24) रात्री ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

कर्जत - दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गावठी पिस्तुलासह पोलिसांनी गुरुवारी (ता. 24) रात्री ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

मिथुन मारुती पालघर (वय 32), अनिल अंकुश शिंदे (वय 35), सुनील गजानन खाणेकर (वय 28), सुनील सुधीर निमसे (वय 31, सर्व रा. मुळशी, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. कर्जत-श्रीगोंदे रस्त्यावरील दूरगाव तलावानजीक मोटारीतून दरोडेखोर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एकूण चौघांना अटक केली. आरोपींकडून मोटर, गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे जप्त केली.

Web Title: 4 robber arrested crime