ट्रान्स्फॉर्मरच्या आगीत चार कामगार होरपळले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई - चेंबूरमधील वामन तुकाराम पाटील मार्गावरील इंडस्ट्रियल इस्टेटमधील "रिलायन्स एनर्जी'च्या ट्रान्स्फॉर्मरला शनिवारी सकाळी आग लागून दुरुस्तीचे काम करणारे चार कामगार होरपळले.

मुंबई - चेंबूरमधील वामन तुकाराम पाटील मार्गावरील इंडस्ट्रियल इस्टेटमधील "रिलायन्स एनर्जी'च्या ट्रान्स्फॉर्मरला शनिवारी सकाळी आग लागून दुरुस्तीचे काम करणारे चार कामगार होरपळले.

आज रिलायन्सचे कामगार वीजजोडणीच्या दुरुस्तीचे काम करत असताना ट्रान्स्फॉर्मरजवळ ठिणगी पडून आग लागली. यात चार कामगार 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होरपळले आहेत. चेंबूर अग्निशामक दलाने तीन बंबांच्या मदतीने आग विझवली. गोवंडी पोलिस याविषयी तपास करत आहेत.

Web Title: 4 worker burn in transformer fire