ठाण्यात 40 लाखांचे मद्य जप्त 

ठाण्यात 40 लाखांचे मद्य जप्त 

ठाणे : राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक प्रक्रिया खुल्या,मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ठाणे जिल्ह्यात मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली असून हे तीन दिवस (ड्राय डे) कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे बंधनकारक केले आहे.दरम्यान,निवडणूक कालावधीत आतापर्यंत प्रशासनाने तब्बल 40 लाखांचे मद्य जप्त केले.अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. 

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार तसेच राज्य उत्पादन शुल्क आयोगाच्या नियमांनुसार सर्व अनुज्ञप्तीधारकांना सूचित केले आहे की मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून म्हणजेच 19 ऑक्‍टो.रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 24 ऑक्‍टो.पूर्ण दिवस मतमोजणीची प्रक्रिया संपुष्टात येईपर्यंत जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्तीधारकांना मद्य विक्रीकरिता ड्राय डे म्हणून पाळणे बंधनकारक असणार आहे. 

ठाणे जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ अनुज्ञप्तीधारकांना या दरम्यानच्या काळात त्यांच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यासह महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत नमूद तरतुदींन्वये संबंधित अनुज्ञप्तीधारकावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान,निवडणूक कालावधीत प्रशासनाने विविध ठिकाणी केलेल्या तपासणीत सुमारे 40 लाखांचे 2 लाख 86 हजार लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे.राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा जिल्हाधीकारी नार्वेकर यांनी केला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com