मध्य रेल्वेच्या 43 हिवाळी विशेष गाड्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

  • एलटीटी, पनवेल ते करमळीदरम्यान या विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत.
  • ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबा

मुंबई : नाताळचा आनंद आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने 43 विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी, पनवेल ते करमळीदरम्यान या विशेष ट्रेन चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना आणि पर्यटकांचा फायदा होणार आहे. 

लोकमान्य टिळक टर्मिनस-करमळी स्पेशल ट्रेनच्या 14 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. 01045 ट्रेन दर शुक्रवारी रात्री 1 वाजून 10 मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी करमळीला पोहचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी 01046 ट्रेन दर शुक्रवारी दुपारी 1 वाजता सुटून त्याच रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. ही ट्रेन 22 नोव्हेंबर ते 3 जानेवारीदरम्यान चालविण्यात येणार आहे. 

का झाली परिणीतीला दुखापत ? हे पहा

01051 एलटीटी-करमळी ट्रेन दर शुक्रवारी (22 नोव्हेंबर ते 3 जानेवारी) रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी करमळीला पोहचणार आहे; तर परतीच्या प्रवासासाठी 01052 ट्रेन दर रविवारी (24 नोव्हेंबर ते 5 जानेवारी) दुपारी 1 वाजता सुटणार असुन रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी एलटीटीला पोहचणार आहे. या दोन्ही स्पेशल ट्रेनला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. 

याशिवाय 01015 पनवेल-करमळी स्पेशल ट्रेन दर रविवारी रात्री 12 वाजून 55 मिनिटांनी सुटणार असून त्याच दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. ही ट्रेन 23 नोव्हेंबर ते 5 जानेवारी दरम्यान सुटणार आहे. प्रवाशांना या स्पेशल ट्रेनचे आरक्षण आज (ता. 20) पासून करता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 43 winter special trains on the Central Railway