मुंबई विमानतळावर 44 लाखांच्या नोटा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने 44 लाखांच्या विदेशी नोटांसह तिघांना ताब्यात घेतले. मोहम्मद सोहेल, शेख वाहिद, शेख युसूफ पाशा अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडे दुबई आणि ऑस्ट्रेलियाचेही चलन सापडले. 

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने 44 लाखांच्या विदेशी नोटांसह तिघांना ताब्यात घेतले. मोहम्मद सोहेल, शेख वाहिद, शेख युसूफ पाशा अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडे दुबई आणि ऑस्ट्रेलियाचेही चलन सापडले. 

हे तिघे मंगळवारी (ता. 27) रात्री मुंबई विमानतळावर पोचले. हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर संशय आला. त्यांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या बॅगेत 44 लाखांच्या विदेशी नोटा सापडल्या. त्यात सौदीचे 1 लाख 39 हजार रियाल, यूएईचे 56 हजार 500 दिराम आणि ऑस्ट्रेलियाचे 14 हजार डॉलर होते. तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा आरिफ कोयंडे या भारतीय प्रवाशाला विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडील 25 लाखांच्या भारतीय नोटा जप्त करण्यात आल्या. त्यात सर्व दोन हजारांच्या नव्या नोटा आहेत. आरिफ दुबईला जाणार होता. बॅगेत त्याने या नोटा लपवून ठेवल्या होत्या. नोटांची दुबईत तस्करी करण्याकरता त्याला कमिशन आणि दुबईला जाण्याकरता विमानाचे तिकीट देण्यात आल्याचे आरिफने चौकशीत सांगितले, अशी माहिती हवाई गुप्तचर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरिफ कोणाच्या सांगण्यावरून या नोटा दुबईत नेत होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Web Title: 44 million of notes seized at Mumbai airport

टॅग्स