राज्यभरातील 48 मोर्च्यांची आझाद मैदानावर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

March on azad ground

मुंबईत सुरू झालेल्या अर्थसंकलपीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आझाद मैदानावर राज्यभरातील सामाजिक संघटना आणि पीडित कुटुंबीयांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Azad Ground March : राज्यभरातील 48 मोर्च्यांची आझाद मैदानावर धडक

मुंबई - मुंबईत सुरू झालेल्या अर्थसंकलपीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आझाद मैदानावर राज्यभरातील सामाजिक संघटना आणि पीडित कुटुंबीयांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. बुधवारी आझाद मैदानावर तब्बल ४८ आंदोलकांची नोंद करण्यात आली. ज्यामध्ये मराठा आरक्षण मोर्चा, माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ, नरिमन पॉइंट येथील महात्मा फुले नगर झोपडपट्टी रहिवासी संघ, प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी असोसिएशन, न्यायालयातील कनिष्ठ लिपिक शिपाई आणि लघुलेखक भरती प्रक्रियेतील उमेदवार, संशोधक विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनांनी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने हजेरी लावली.

माहिती अधिकारी अधिनियमाची प्रभावी अमलबजावणी होत नाही. आयोगाच्या सर्व कार्यालयांमध्ये एकूण आज एक लाखांपेक्षा जास्त अपिले प्रलंबित आहे. अपिलांच्या सुनावणी होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा विलंब लागत आहे. त्यामुळे जागरूक नागरिकांचा कायद्यावरील विश्वास डळमळू लागला आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या प्रमाभी अमलबजावणीच्या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशनचे अध्यक्ष सुभाष बसवेकर आंदोलनाला बसले आहे.

महात्मा फुले नगर नरिमन पॉइंट झोपडपट्टीत २००४ ते २०१४ पर्यंत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे १५० झोपडपट्ट्या पाडून २०१५ नंतर बेघर करण्यात आले होते. त्यांनतर हककाचे घर मिळावे यासाठी सबंधित विभाग आणि शासन दरबारी निवेदन देण्यात आले मात्र, अद्याप घे मिळत नसल्याने, हककचे घर मिळावे यासाठी स्थानिक बेघर झालेल्या नागरिकांकडून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

२४ नोव्हेंबर २००१ नंतर महाराष्ट्र सरकार ने विना अनुदानित धोरण स्वीकारले असून, तत्पूर्वी ची सर्व महाविद्यालये अनुदानास पात्र आहेत. याच धोरणानुसार राज्यातील २००१ पूर्वीची कला, विज्ञान , व वाणिज्य महाविद्यालय अनुदानित झालेली आहेत. तसेच नंतरच्या काळात व्यावसायिक महाविद्यालयांपैकी २००१ पूर्वीच्या विधी महाविद्यालयांना अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे २००१ पूर्वीच्या स्थापित झालेल्या ८९ शिक्षणशास्त्र महाविद्यालये त्याच धोरणाअंतर्गत अनुदानास पात्र आहे. सध्या स्थितीत यातील काही महाविद्यालय बंद पडली आहे. सुमारे ८० महाविद्यालय चालू असून, त्यांना अनुदान मिळावे अशी प्राचार्य,प्राध्यापक, व शिक्षकेत्तर कर्मचारी असोसिएशन ने मागणी केली आहे.

जिल्हा व सत्र न्यायालयातील २०१८ मध्ये कनिष्ठ लिपिक, शिपाई, आणि लघुलेखक, या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या ८९२१ पैकी अद्याप पर्यंत कोरोना विषाणूमुळे नियुक्ती मिळण्यापासून वंचित असलेले जवळपास १४०० पेक्षा जास्त उमेदवारांना २१ सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार इतर विभागांना सामावून घेतल्या प्रमाणे उर्वरित उमेदवारांनाही न्यायालयीन सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आधी छात्रवृत्ती अंतर्गत सर्व पात्र ८६१ विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट फेलोशिप मंजूर करण्याच्या तसेच निवड झालेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना तात्काळ अवार्ड लेटर देण्याच्या मागणीसाठी पीडित उमेदवारांनी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.

आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा देऊन अर्थसंकल्पातून किमान वेतनासाठी निधीची तरतूद करण्यासाठी आझाद मैदानावर १ मार्च पासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरातील हजारो संघनक परिचालक आझाद मैदानावर आले आहे.

आझाद मैदानातील आंदोलकांची माहिती

- मधुकर रगडे, महात्मा फुले विकास महामंडळात भ्रष्टाचाराची चुकशी

- रमेश उजागरे - आश्रम शाळेच्या शिक्षकांना पगार मिळावा

- दीपक खिल्लारे - विना अनुदानित महाविद्यालयांना अनुदान मिळावे

- दत्तात्रय पेटकर - शेतातून रेल्वे लाईन आणि रस्ता गेल्याने त्याची भरपाई मिळावी

- सुभाष सावंत - वाकोला मुंबई येथील शाळेवर कारवाई करावी

- सुरेश गायकवाड - संस्थेसाठी घाटकोपर येथे जमीन मिळावी

- विदुलता कोल्हे - bed, ded कॉलेजला अनुदान मिळावे

- राजेंद्र कांबळे - कोल्हापूर येथे कुटुंबावर अन्याय

- ईश्वर अडसूळ - राष्ट्रीय संशोधन छात्र अवॉर्ड लेटर मिळावं

- पांडुरंग कुंभार - भिवंडी येथील pwd बांधकामाच्या चौकशी करून कारवाई करावी

- अशोक वैध : bmc बद्दल भ्रष्टाचाराची चौकशी करावी

- अक्कताई काळे - पोलिसांकडून अन्याय होत असल्या बद्दल

- ऋषिकेश कुलकर्णी - उच्च न्यायालयात नियुक्त्या द्याव्या

- जानका उदमले - शेजाऱ्याच्या त्रासाबद्दल

- नंदकुमार दरणे - राजगड जिल्ह्यातील उरण येथील प्लांट बद्दल

- लुलाजी सावंत - पंधरा वर्षांपूर्वी बलात्कार झाल्याची चौकशी करावी

- विक्रम कांबळे - ग्रँट रोड मुंबई येथील खोल्यांचा भ्रष्टाचार होत असल्याबद्दल 7387301188

- भाऊसाहेब शिंदे - दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होण्याबाबत

- रवींद्र गांगुर्डे - रिक्षा टॅक्सी चालकांना कमी दरात cng मिळावा

- प्रतापसिंग दातार - रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराबाबत

- सुदाम कांबळे - बिल्डर. व तहसीलदार यांनी बनवलेला दस्त्वेज रद्द करावा

- संतोष गायकवाड - औरंगाबाद येथील pwd बांधकामाबाबत भ्रष्टाचाराबाबत

- अनंत निकम - सेवानिवृत्त कॅप्टन पदाचे ओळखपत्र मिळावे आणि पेन्शन मिळावे

- दत्तात्रय सुक्रे - चासकमान प्रकल्प ग्रस्त

- दीपक दसवळकर- गनकवडी पुणे फायनान्स कंपनीने फसवणूक केल्याबाबत

- जयंत वाळुंज - mseb मंचर यांच्याविरुद्ध तक्रार

- दत्तात्रय अनंतवार - obc ची जनगणना व्हावी

- हरिभाऊ पेटकर - विधानसभेतील हिवाळी अधिवेशनाची माहिती मिळावी

- धनराज थोरात - बेघरांना घरे मिळावी

- बालाजी कांबळे - अंधेरी येथील सुमेर कॉर्पोरेशन बिल्डर यांच्या विरुद्ध तक्रार

- आशा गायकवाड - प्रधनमंत्री आवास योजनेत घर मिळावे

- सिद्धेश्वर मुंडे - संगणक परिचालक

- रमेश केरे पाटील=- मराठा आरक्षण बाबत

- सागर मंदरे - नागपूर वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीबाबत तक्रार

- सौदागर पाशामिया - महाराष्ट्रातील सर्व भ्रष्टाचाराबाबत तक्रार

- दत्ता सूर्यवंशी - मराठा आरक्षणाबाबत

- निलेश रहाटे - ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत

- सुभाष बसवेकर - माहिती अधिकाराबाबत

- मनोज शिंदे - sc, st लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थंकल्पात वित्तीय तरतूद करावी

- समसंग गायकवाड - नागपाडा मुंबई येथील मराठी मिशन शाळा बंद पाडण्याचे कट

- आश्विन कुमार सिंघा - देशातील सिस्टीम बंद करावी

- दिपस खाजगे - पाथर्डी पंचायत समिती बाबत तक्रार

- श्रीपाद खरात - परिवाराच्या जीवितास धोका

- ज्ञानेद्र चौधरी - छत्रपती शिवाजीरज यांचा चित्रपट बनविण्यासाठी अनुदान मिळण्याबाबत आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा पुतळा जुहू चौपाटीवर लावण्याबाबत

- निर्मळ कांबळे - बिएम सी ने घर तोडल्याबाबत

- हरी लंके - भंडारा जिल्ह्यातील खासगी शाळेने नोकरी वरून काढल्याबद्दल

- राजू हुलगुंडे - हिंगोलीत रस्त्याचे काम केल्यानंतर पैसे मिळाले नसल्याबाबत

टॅग्स :maharashtraMumbaiRally