पशुवैद्यकीय रुग्णालय पुनर्विकासात अडथळा ठरणारी 49 झाडे तोडणार 

पशुवैद्यकीय रुग्णालय पुनर्विकासात अडथळा ठरणारी 49 झाडे तोडणार
पशुवैद्यकीय रुग्णालय पुनर्विकासात अडथळा ठरणारी 49 झाडे तोडणार

मुंबई ः मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे कापण्यावरून वाद सुरू आहे. त्यातच आता लोअर परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्विकासात अडथळा ठरणारी सुमारे 49 झाडे तोडली जाणार आहेत. त्यापैकी 31 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. निवडणूक आचारसंहितेनंतर वृक्षतोडीचा हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. 

लोअर परळ गाव परिसरात असलेल्या मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. रुग्णालयाच्या परिसरात एकूण 88 झाडे आहेत. त्यापैकी 49 झाडे काढण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती या प्रकल्पाच्या वास्तुविशारदाने वृक्ष प्राधिकरणाकडे मागितली आहे. उर्वरित झाडे आहे त्याच स्थितीत ठेवली जाणार आहेत, असे या प्रस्तावात म्हटले आहे. 

पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी कापल्या जाणाऱ्या आणि पुनर्रोपण केल्या जाणाऱ्या झाडांमध्ये सोनमोहोर, नारळ, आंबा, पिंपळ, जांभूळ, रामफळ, फणस, अशोक, वड यासह पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या झाडांचा समावेश आहे. 

पुनर्रोपण हीसुद्धा झाडांची कत्तलच! 
या प्रकल्पातील 31 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असले तरी पुनर्रोपण म्हणजे एक प्रकारे झाडांची कत्तलच असते, असा दावा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. पुनर्रोपण केलेली किती झाडे जगतात, त्याचा कोणताही हिशेब पालिका देत नसल्याने पुनर्रोपणावर कोणताही विश्‍वास ठेवता येत नसल्याची माहिती एका पर्यावरणवादी कार्यकर्त्याने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com