कुर्ला-अंबरनाथ लोकल घसरली, डेक्कन क्वीन रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई- कुर्ला येथून अंबरनाथकडे जाणाऱ्या लोकल रेल्वेचे पाच डबे आज (गुरुवारी) सकाळी रुळावरून घसरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, डेक्कन क्वीन एक्सप्रेस आणि इंटरसिटी या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  

ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकांदरम्यान ही रेल्वे घसरल्याने मुंबईतील जीवनवाहिनी असलेल्या लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. अजमेर-सियालदा एक्सप्रेस रुळावरून घसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच रेल्वे अपघात झाला आहे.

कल्याण आणि अंबरनाथ यादरम्यान जादा बस सोडाव्यात अशी विनंती सेंट्रल रेल्वेने महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. गुरुवारी पहाटे 5.53 वाजता हा अपघात झाला. मुंबई उपनगर रेल्वेच्या सेंट्रल लाईनवरील वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे. तसेच, कल्याण-कर्जत लाईनवरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन व इंटरसिटी या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली. 

Web Title: 5 Coaches Of Kurla-Ambarnath Local Train Derail Near Mumbai