खळबळजनक घटना! रुग्णालयात बेड्स नसल्याने 5 पॉझिटिव्ह रुग्ण 4 दिवसांपासून घरीच.. परिसरात संसर्गाची भीती.. 

corona
corona

मुंबई : पालिकेने तयार केलेल्या कोविड सेंटर्समध्ये बेड्सच उपलब्ध नसल्याने त्यासाठी वणवण फिरणारे उल्हासनगरातील 5 पॉझिटिव्ह रुग्ण हे 4 दिवसांपासून घरीच असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

रुग्ण फिरल्याने व ते घरीच असल्याने परिसरात कोरोना संक्रमणाची भीती नागरिकांत निर्माण झाली आहे. ही माहिती कळताच महापौर लिलाबाई यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन या पाचही जणांची  नवनिर्मित तहसीलदार इमारतीच्या कोविड सेंटरमध्ये व्यवस्था केली आहे.

नेमकं काय घडलं: 

 कॅम्प क्रमांक 5 परिसरातील गुजराथी पाडा या झोपडपट्टी वस्तीतील एक व्यक्ती दिनांक 2 जुलै रोजी कोरोना पॉझिटीव्ह आढळला त्याला महानगरपालिकेच्या  आरोग्य विभागाने  उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर त्या व्यक्तीच्या घरातील कोरोना साखळी तोडण्यासाठी 4 जुलै रोजी त्याच्या घरातील इतर पाच जणांना महानगरपालिकेने क्वारंटाईन करून टेउराम कोविड चाचणी सेन्टर मध्ये पाचही जणांचे कोरोना चाचणी नमुने घेतले आणि ह्या पाचही जणांना भिवंडी येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले. 

दिनांक 6 जुलै रोजी त्या पाचही जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.त्यानंतर सदर पाचही जणांना उपचारार्थ दुपारी उल्हासनगर येथील वेदांत कोविड केयर सेंटर येथे आणण्यात आले, मात्र तिथे बेड उपलब्ध नसल्याने त्या पाच जणांना यांना रात्री 9  वाजता कामगार रुग्णालय कोविड केयर सेंटर येथे पाठविण्यात आले, मात्र तिथेही बेड उपलब्ध नसल्याने त्या पाचही जणांना रात्री बारा वाजेपर्यंत रुग्णालया बाहेर उभे राहावे लागले.

मात्र त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही ,दरम्यान वैतागून हे कुटूंब मध्यरात्री शहरातून चालत साधारण 3  किलोमीटर लांब स्वतःच्या राहत्या घरी निघून आले. 9 ते 13 जुलै पर्यंत ह्या पाच पॉझिटीव्ह रुग्णाची चौकशी देखील आरोग्य विभागाने केली नसून सदरचे पॉझिटीव्ह रूग्ण  गेले कुठे? ह्याचा तपास सुद्धा आरोग्य विभागाने केलेला नाही, कोरोना रुग्णांबाबत उल्हासनगर महानगरपालिका प्राशसन किती गंभीर आहे, हे या उदाहरणावरून दिसून येत आहे.

दरम्यान  हा खळबळजनक आणि तेवढाच धक्कादायक प्रकार  महापौर लिलाबाई आशान, शिवसेना नगरसेवक असून आशान यांना समजताच त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिका पाठवून या पाचही जणांना तहसीलदार कार्यालयाच्या नवनिर्मित कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

( संकलन - अथर्व महांकाळ )

5 corona patients did not get beds then took this step 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com