
Vande Bharat Express : उन्हाळी सुट्टीमुळे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती!
मुंबई : उन्हाळी सुट्या आणि लग्न सराई असल्यामुळे मध्य रेल्वेवर धावणाऱ्या सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी - सोलापूर आणि नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे अवघ्यासाडे तीन महिनात शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसने तब्बल तीन लाख १६ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर डिसेंबरपासून सुरु झालेल्या नागपुर-बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेसने पावणे दोन लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहेत.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वसानिमित्त देशभरात ७५ वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात येणार आहेत. सध्या मध्य रेल्वेवर सीएसएमटी-साईनगर शिर्डी,सोलापूर आणि नागपुर-बिलासपुर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. या तिन्ही गाड्यांना उन्हाळी सुट्टीमुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.यामुळे रेल्वेच्या महसुलात देखील भर पडत आहे.
सीएसएमटी- शिर्डी आणि सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेस १० फेब्रुवारी २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आली. मात्र, वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला सुरुवातीला प्रवाशांचा सुट्टीचा दिवशी तुफान प्रतिसाद मिळात होता. परंतु आता प्रवाशांमध्ये वंदे भारत ट्रेन लोकप्रिय होत आहे. अवघ्या साडे तीन महिन्यात मुंबई -शिर्डी वंदे भारत ट्रेनमधून एकूण १लाख ६२हजार ३२४ तर मुंबई -सोलापूर वंदे भारत ट्रेनमधून १ लाख ५४हजार ६४७ आणि नागपुर-बिलासपुर १लाख ७४हजार ४५० प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मे महिना सुसाट
वंदे भारत एक्सप्रेस- --तारिख-- प्रवासी संख्या
२२२२३ सीएसएमटी-साईनगर शिर्डी - २० मे -१००.७९टक्के
२२२२४ साईनगर शिर्डी-सीएसएमटी- २१ मे - १०३.६३टक्के
२२२२५ सीएसएमटी-सोलापूर- १२ मे- ११९.४५टक्के
२२२२६सोलापूर-सीएसएमटी - २ मे- १५१.२४टक्के
२०८२६ नागपुर-बिलासपुर- १९मे- १३३.३९टक्के
२०८२५बिलासपुर-नागपुर- २३ मे- १३७.५४टक्के
- वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य
- ताशी १८० ते २०० किमी वेगाने धावणार
- संपूर्ण डबे वातानुकिलत असणार
- जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्यूअल माहिती प्रणाली
- स्वयंचलित खिडक्या आणि दरवाजे
- अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
- प्रत्येक डब्यात इमरजेंसी पुश बट
- वैक्युम आधारित टायलेट
- १८० डिग्री फिरणारी आसने
आधुनिक वंदे भारत-
वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना विमानासारखा प्रवासाचा अनुभव प्रदान करणाऱ्या कवच तंत्रज्ञानासह प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या असंख्य उत्कृष्ट सुविधा देते. वंदे भारत ट्रेनमधील सर्व बाजूला १८० अंश फिरणाऱ्या आसनांच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांसह अस्लेल्या आसनांची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक कोचमध्ये ३२” स्क्रीन आहेत ज्यात प्रवाशांची माहिती आणि इन्फोटेनमेंट आहे. दिव्यांगांसाठी अनुकूल स्वच्छतागृहे आणि आसन क्रमांक ब्रेल अक्षरात असलेले आसन हँडलही देण्यात आले आहेत. जंतू-मुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अल्ट्रा व्हायोलेट (UV) दिव्यासह टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम टॉयलेटची सुविधा.