देशभरात 50 बॅंकांच्या शाखांची तपासणी

पीटीआय
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नोटाबंदीनंतरच्या गैरप्रकारांचा सक्त वसुली संचालनालयाकडून शोध सुरू
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर आर्थिक गैरप्रकार करणाऱ्या देशभरातील दहा बॅंकांच्या 50 शाखांची तपासणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सुरू केली. करचुकवेगिरी आणि हवाला व्यवहारांचा शोध घेण्यासाठी या बॅंकांचे व्यवहार तपासण्यात येत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अनेक पथकांनी देशभरातील किमान दहा बॅंकांच्या 50 शाखांमध्ये आज सकाळीच व्यवहार तपासण्यास सुरवात केली. यात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बॅंकांचा समावेश आहे. या तपासणीत ताळेबंद तपासणीपासून व्यवहारांचे तपशील, खात्यांचा लेखाजोखा पाहण्यात येत आहे. याविषयी आर्थिक गुप्तचर यंत्रणांनी ईडीला माहिती दिली आहे. ईडीने दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, कोलकता आणि चेन्नई या महानगरांमधील बॅंक शाखांची तपासणी आज सकाळी सुरू केली.

अन्य शहरांमधील मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा जमा झालेल्या आणि संशयास्पद व्यवहार असलेल्या बॅंक शाखांची तपासणी करण्यात येत आहे.
बॅंकांचे आर्थिक व्यवहार तपासल्यानंतर प्रामुख्याने दोन कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. करचुकवेगिरी प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) आणि परकी चलन विनिमय व्यवस्थापन कायदा (फेमा) यांचा यात समावेश आहे. याआधी ईडीने ऍक्‍सिस बॅंकेच्या दिल्ली शाखेतील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तसेच मागील आठवड्यात ईडीने देशभरातील 40 ठिकाणी छापे चलन विनिमय आणि हवाला व्यावसायिकांवर टाकले होते.

बॅंकांच्या कामकाजावर परिणाम नाही
बॅंकांच्या शाखांमध्ये 8 नोव्हेंबरनंतर झालेले व्यवहार तपासण्यात येत आहेत. यामुळे बॅंकांचे दैनंदिन कामकाज आणि ग्राहक सेवांवर परिणाम होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे, अशी माहिती सक्त वसुली संचालनालयातील सूत्रांनी दिली.

Web Title: 50 branches inspection of banks