म्हाडा वसाहतींमधील सुविधांसाठी 500 कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

मुंबई - म्हाडाने 50-60 वर्षांपूर्वी उभारलेल्या वसाहतींमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असल्याने रस्ते, पर्जन्यवाहिन्या नव्याने उभारण्यासाठी म्हाडाने 500 कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वसाहतींतील हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

म्हाडाने शहर आणि उपनगरांत 56 वसाहती उभारल्या आहेत. 1960 ते 1970 या कालावधीत उभारलेल्या या वसाहतींमध्ये म्हाडाने अंतर्गत रस्ते, पर्जन्यवाहिन्या, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या अशा विविध पायाभूत सुविधा दिल्या आहेत. या सुविधा एक चटईक्षेत्र निर्देशांक आणि रहिवाशांची संख्या विचारात घेऊन निर्माण करण्यात आल्या होत्या. यापैकी काही वसाहतींचा पुनर्विकास सुरू आहे, तर काहींचा पूर्ण झाला आहे. अनेक वसाहतींचा पुनर्विकास मार्गी लागणार नसल्याने येथील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: 500 Crore for Mhada Society Facility