मुंबईत 500 WiFi हॉटस्पॉट सुरू : मुख्यमंत्र्यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

तुमच्या परिसरातील वायफाय हॉटस्पॉट या लिंकवर तुम्ही शोधू शकता- https://t.co/89CSobykNI  
तसेच, या सेवेबाबतचा प्रतिसाद किंवा तक्रारी
@AS_Mum_WiFi या ट्विटर हँडलला बिनधास्त सांगाव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे. 

मुंबई- इंटरनेट सुविधा देणारे 500 वायफाय हॉटस्पॉट मुंबईत विविध ठिकाणी आतापासून त्वरीत 'लाईव्ह' करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

'मुंबई वायफाय' ही भारतातील सर्वांत मोठी वायफाय सेवा आहे. जगातील सर्वांत मोठ्या वायफाय सेवांमध्येही या सेवेची गणना होईल. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
तुमच्या परिसरातील वायफाय हॉटस्पॉट या लिंकवर तुम्ही शोधू शकता- https://t.co/89CSobykNI  
तसेच, या सेवेबाबतचा प्रतिसाद किंवा तक्रारी @AS_Mum_WiFi या ट्विटर हँडलला बिनधास्त सांगाव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे. 

पहिल्या टप्प्यात 500 ठिकाणी वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून, आश्वासन दिल्याप्रमाणे 1 मे 2017 पर्यंत एकूण 1200 वायफाय हॉटस्पॉट सुरू होतील. दरम्यान, वायफायचा वेग आणि जोडणीतील (कनेक्टिव्हिटी) प्रगती यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत.
मुंबईकरांना चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 'वायफाय'संबंधीच्या समस्या प्राधान्याने सोडवू, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. 

या सेवेचा चाचणी कालावधी 2 ते 8 जानेवारी होता. या काळात मुंबईतील सुमारे 23 हजार युजर्सनी या सेवेसाठी साईन-अप केले असून, एकूण 2 टीबी डेटा डाऊलोड करण्यात आला. 
"महाराष्ट्राच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी 'आपले सरकार'ची वचनबद्धता कायम ठेवत आमच्या सरकारने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे," असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले  आहे.

Web Title: 500 WiFi Hotspots go live across various locations in Mumbai