सुरक्षा शुल्काचे 5.11 कोटी थकीत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मुंबई - विविध कारणांमुळे सुरक्षा पुरवलेल्या 38 जणांनी मुंबई पोलिसांचे 5.11 कोटी रुपये सुरक्षा शुल्क थकवले आहे. त्याच्या वसुलीसाठी पोलिसांनी संबंधितांना नोटिसा पाठवल्या आहेत. 

मुंबई - विविध कारणांमुळे सुरक्षा पुरवलेल्या 38 जणांनी मुंबई पोलिसांचे 5.11 कोटी रुपये सुरक्षा शुल्क थकवले आहे. त्याच्या वसुलीसाठी पोलिसांनी संबंधितांना नोटिसा पाठवल्या आहेत. 

व्यावसायिक, उद्योजक, विकसक, अभिनेते यांना अंडरवर्ल्डकडून खंडणीकरिता फोन केले जातात. अशा धमकावण्यात आलेल्या किंवा ज्यांच्या जीवाला धोका आहे, अशांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते. मुंबई पोलिसांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागामार्फत आढावा घेतल्यानंतरच सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतला जातो. त्यानुसार 2007 ते 2017 या काळात दोन हजार 293 जणांना सुरक्षा पुरवली होती. त्यापोटी 44 कोटी रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. यंदा मार्चअखेरपर्यंत पोलिसांनी 219 जणांना सुरक्षा पुरवली. त्यांनी 1.54 कोटी शुल्क जमा केले आहे; पण 38 जणांनी हे शुल्क अदा केलेले नाही. ही थकबाकी 5 कोटी 11 लाख इतकी आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

पोलिस संरक्षण शुल्काच्या थकबाकीबाबत गेल्या वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने राज्य सरकारला शुल्क वसुलीची सूचना दिली होती. या यादीत विकसक आणि व्यावसायिक असल्याचे उघड झाले होते. 

वर्ष.........संरक्षण दिलेल्यांची संख्या 
2014......271 
2015........311 
2016.........205 
2017..........231 
2018 (मार्च).......219 
(संदर्भ : गृहविभाग) 

29 कोटी 91 लाख : चार वर्षांतली वसुली 
1 हजार 93 जणांना 2007 ते 2012 या काळात संरक्षण 

Web Title: 5.11 crore outstanding security charges