मुंबई : पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

52-year-old man arrested for allegedly raping a 5-year-old minor on her school premises
52-year-old man arrested for allegedly raping a 5-year-old minor on her school premises

मुंबई : मुलुंड येथील पूर्व उपनगरातील शाळेच्या आवारात पाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका शाळेतील शिपायाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलि‍सांनी मंगळवारी दिली. वस्तीत राहणारी पीडित मुलगी सोमवारी शाळेच्या मैदानावर खेळण्यासाठी आली तेव्हा हा धक्कादायक प्रकरा घडला, असे नवघर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने सांगितले. (Mumbai Crime News)

51 वर्षीय आरोपीने मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला आवारातील एका खोलीत नेले आणि घ तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेने तिच्या घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली, अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी गेल्या 30 वर्षांपासून शाळेत काम करत आहे.

52-year-old man arrested for allegedly raping a 5-year-old minor on her school premises
राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर संजय पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..

घटना उघडकीस आल्यानंतर, आम्ही ताबडतोब एक टीम तयार केली आणि आरोपीला पकडले. त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 376 (बलात्कार) आणि लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलीस उपायुक्त (डीसीपी) झोन 7 प्रशांत कदम यांनी ही माहिती दिली. दरम्यान पिडीतेला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

52-year-old man arrested for allegedly raping a 5-year-old minor on her school premises
'रावणापेक्षाही राज ठाकरेंकडून उत्तर भारतीयांवर जास्त अत्याचार'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com