बेस्टच्या 522 बसगाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत 

बेस्टच्या 522 बसगाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत 

मुंबई -  मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी बेस्ट उपक्रमाच्या पाचशेहून अधिक बस देण्यात आल्या होत्या. मतदान झाल्यानंतर सोमवारी (ता. 29) सायंकाळपासून या बसगाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. 

निवडणुकीच्या कामासाठी बेस्टच्या 449 बसगाड्या निवडणूक आयोगाने आणि 73 बसगाड्या पोलिसांनी मागवल्या होत्या. बेस्टच्या 3,500 पैकी 522 बसगाड्या शनिवारपासून निवडणुकीच्या कामासाठी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना दोन दिवस अडचणींना सामोरे जावे लागले. बंदोबस्तावरील पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बेस्ट बसगाड्यांचा वापर करण्यात आला. या सर्व बसगाड्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बेस्ट उपक्रमाकडे सोपवण्यात आल्या. या बसगाड्यांसाठी बेस्टने चालक पुरवले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com