५५० खाटा आणि २० शस्त्रक्रियागृहं ; हाफकीनमध्ये होणार नवं कॅन्सर रुग्णालय

५५० खाटा आणि २० शस्त्रक्रियागृहं ; हाफकीनमध्ये होणार नवं कॅन्सर रुग्णालय

मुंबई : देशभरातून येणार्‍या कॅन्सर रुग्णांची संख्या लक्षात घेता टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल आता हाफकिनमध्येही उभारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती टाटा कॅन्सर रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी दिली आहे. याचबरोबर हाफकिन इथले मोठे वृक्ष न तोडता हे हॉस्पिटल बांधलं जाणार आहे. टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल इथे  मुंबई आणि महाराष्ट्रच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. तब्बल ६५००० रुग्ण इथे उपचारासाठी तर ४ लाख ५० हजार रुग्ण इथे तपासणीसाठी येत असतात.

देशभरातील कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्करोगावरील उपचारांत देशपातळीवर एकसमानता निर्माण करून देशात १८० ठिकाणी ‘नॅशनल कॅन्सर ग्रीड’ निर्माण करण्याचे काम टाटा कॅन्सर हॉस्पिटलनं केलं आहे. सद्यस्थितीत परळमध्ये असलेल्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जागेची आणि सेवांची कमतरता जाणवू लागल्याने हॉस्पिटल प्रशासनाने हे नवीन हॉस्पिटल हाफकिन संस्थेच्या ५ एकर जागेत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.  

कसं असेल हे रुग्णालय ?

हॉस्पिटलबरोबरच डॉक्टर आणि परिचारिकांच्या राहण्यासाठी १५ मजली निवासी इमारत बांधण्यात आली असून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळाही बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयात एकूण ५५० खाटा आणि २० शस्त्रक्रियागृहं असणार आहेत. या रुग्णालायसाठी एकूण ४५० कोटी खर्च येणार आहे. तर धर्मशाळा, डॉक्टर आणि परिचारिकांच्या वसाहतीसाठी २३० कोटी अशी तब्बल ६८० कोटींची रक्कम लागणार आहे. धर्मशाळेचा खर्च काही दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून केला जाणार आहे अशीही माहिती श्रीखंडे यांनी दिलीये.  

या कर्करोगांवर होणार उपचार 

--  जठराचा कर्करोग
--  कान-नाकाचा कर्करोग
--  मेंदूचा कर्करोग
--  हाडांचा कर्करोग
--  मूत्राशयाचा कर्करोग
--  थोरसिक कर्करोग

यांसारख्या काही कर्करोगांवर या नवीन कॅन्सर रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.

जुन्या म्हणजेच परळच्या रुग्णालयात प्रामुख्याने स्तनाच्या आणि अन्य कर्करोगांवर उपचार केले जाणार आहेत. दरम्यान देशभरातून मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयाचा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्यावर आमचा भर राहील, असं टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजन बडवे यांनी सांगितलंय. 

550 beds and 20 operation theaters new cancer hospital at haffkin

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com