मध्य रेल्वेत एएलपी पदाच्या 565 उमेदवार नियुक्तीविना; तात्काळ नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांची निदर्शने

मध्य रेल्वेत एएलपी पदाच्या 565 उमेदवार नियुक्तीविना; तात्काळ नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांची निदर्शने

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने 2018 मध्ये असिस्टंट लोको पायलट (एएलपी) पदासाठी काढलेल्या भरती प्रक्रियेतील 565 पात्र उमेदवार अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. नियुक्ती मिळत नाही, त्याशिवाय पाठपुरावा करून मध्य रेल्वे प्रशासनाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने अखेर सोमवारी (ता.1) रोजी पात्र उमेदवारांनी आपल्या प्रमुख मागण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर शांततापूर्वक निदर्शने केले.

मध्य रेल्वेच्या असिस्टंट लोको पायलट पदासाठी या उमेदवारांचे पात्रता यादीत नाव आहे. मात्र गेल्या एक वर्षांपासून फक्त नियुक्तीची वाट बघावी लागत आहे. यातील काही पात्र उमेदवारांना फेब्रुवारी 2020 मध्येच नियुक्ती पत्र आल्याने हातात असलेली नौकरी सोडून रेल्वेच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत पात्र विद्यार्थी असतांना, मध्य रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी नियुक्ति संदर्भातील वेळापत्रक वेळोवेळी बदलून पात्र विद्यार्थ्यांना फक्त आश्वासन दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

पदाच्या जाहिरातीतील नियुक्तीच्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळून त्यांचे प्रशिक्षण होणे अपेक्षित होते. मात्र, झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भुसावळ ने वेळोवेळी वेळापत्रकांमध्ये बदल केल्याने भविष्यातही यामध्ये बदल केला आहे. त्यामुळे भविष्यातही भुसावळ झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वेळापत्रकात बदल करून, विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याची शक्यता असल्याची विद्यार्थ्यांनी भीती व्यक्त केली आहे. पश्चिम रेल्वेतील पात्र विद्यार्थ्यांना मध्य रेल्वेच्या पात्र विद्यार्थ्यांच्या गुणांच्या तुलनेत कमी गुण मिळाले असतांनाही त्यांची नियुक्ती झाली असून, मध्य रेल्वे मात्र अन्याय करत असल्याचा आरोप सुद्धा विद्यार्थ्यांनी केला आहे.

मुख्य मागण्या
- 31 डिसेंबर 2020 पर्यंत सर्व 565 एएलपी उमेदवारांना त्वरित नियुक्ती मिळावी.  
- सेंट्रल रेल्वे मुख्यालयाने प्रकाशित केलेल्या जुन्या वेळापत्रकानुसार सर्वांचे प्रशिक्षण एप्रिल 2021 सुरू करावे. आणि नवीन प्रशिक्षण वेळापत्रक रद्द करावे.
- महाराष्ट्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्था 50% क्षमतेसह सुरू कराव्यात. 
- जर झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भुसावळ ट्रेनिंग करण्यास असक्षम असल्यास देशातील कोणत्याही 
रेल्वे प्रशिक्षण केंद्रात पाठवून प्रशिक्षण द्यावे.
- कोविड 19 मुळे पश्चिम रेल्वे ने जसे ऑनलाईन ट्रेनिंग दिली त्याच पद्धतीने सेंट्रल रेल्वे ने देखील सर्व उमेदवारांना ऑनलाईन ट्रेनिंग द्यावी.

अशी होती भरतीची जाहिरात
वर्ष 2018 मध्ये ही जाहिरात निघाली होती. ज्यामध्ये 1480 पद मध्य रेल्वेच्या मार्फत भरण्यात येणार होते. तर संगणक आधारित पहिली परीक्षा 1 ऑगष्ट रोजी ठेवण्यात आली होती. त्यानंतर संगणक आधारित दुसरी परीक्षा जानेवारी 2019 मध्ये ठेवण्यात आली.त्यानंतर मानसशास्त्र चाचणी मे 2019 तर कागदपत्र तपासणी आणि शारीरिक तपासणी जुलै 2019 त्यानंतर निवड यादी तयार करण्यात आली.

565 candidates for the post of ALP in Central Railway without appointment, Student protests for immediate appointmen

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com