पूरग्रस्तांसाठी ५७० वैद्यकीय पथके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पूरग्रस्त भागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. दरम्यान, राज्यभरात सध्या ५७० वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे १९६ तर सांगली येथे १४४ पथके कार्यरत आहेत.

मुंबई - पूरग्रस्त भागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. दरम्यान, राज्यभरात सध्या ५७० वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे १९६ तर सांगली येथे १४४ पथके कार्यरत आहेत.

मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची तपासणी करून तेथे ठेवलेल्या नोंदवहीत आजारनिहाय माहिती ठेवली जाते. दररोज सायंकाळी त्याचा एकत्रित डेटा तयार करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काही भागांत मदत छावण्यांमधून नागरिक घराकडे परतत आहेत. त्यांना पाणी शुद्धीकरणासाठी क्‍लोरीनच्या गोळीचा वापर कसा करावा याचीदेखील माहिती दिली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 570 Medical Team for Flood Affected