कोरोना लॉकडाऊनमध्ये 58 टक्के महिला डॉक्टरांनी स्विकारला टेलिमेडिसीनचा पर्याय

कोरोना लॉकडाऊनमध्ये 58 टक्के महिला डॉक्टरांनी स्विकारला टेलिमेडिसीनचा पर्याय

मुंबई : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर उपचारांमध्ये टेलिमेडिसीनचा वापर वाढला असून देशभरातील 58 टक्के महिला डॉक्टरांनी टेलिमेडिसीनचा पर्याय स्विकारला आहे. नुकताच अमेरिकेतील परड्यू विद्यापीठ आणि स्ट्रेटजिक मार्केटिंग सोल्यूशन्स अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील डॉक्टरांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात ही बाब समोर आली आहे.

या अहवालानुसार, तरुण वयातील 50 टक्के डॉक्टरांनीही टेलिमेडिसीनला पसंती दर्शवली आहे. यात प्रकर्षाने पुरुष डॉक्टरांपेक्षा महिला डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे. उपचारांचा विलंब टाळून संपर्करहित आरोग्यसेवेचा हा पर्याय रुग्णांमध्येही आता रुजत असल्याचे या अभ्यास अहवालातून दिसून आले आहे. या अहवालानुसार, 44 टक्के पुरुष डॉक्टरांनी टेलिमेडिसीनची सेवा सुरु केली आहे. देशातील 80 शहरांतील 2 हजार 116 डॉक्टरांशी संवाद साधून याविषयी अभ्यास करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणात फिजिकल क्लिनिक्स ऑनलाइन सल्ल्यांमध्ये रुपांतर झाले आहे.

दक्षिणेतील डॉक्टरांनी सर्वाधिक टेलिमेडिसीन स्विकारले - 

या अहवालानुसार, प्रॅक्टीस मॅनेजमेंट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 11 टक्के डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला दिला आहे. तर, 82 टक्के डॉक्टर्स फोनच्या माध्यमातून ही सेवा देत आहेत. दक्षिणेतील 62 टक्के डॉक्टरांनी टेलिमेडिसीन सर्वाधिक स्विकारले आहे. तर उत्तरेला हे प्रमाण 50 टक्के आणि पश्चिमेला 52 टक्के आहे. पूर्वेकडे हे प्रमाण सर्वांत कमी असून केवळ 30 टक्के एवढे आहे. रुग्णांनीही ऑनलाइनच्या माध्यमातून समाधानकारक सेवा देत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

58 percent of female doctors used telemedicine option amid corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com