59 चीनी अॅपवरील बंदीच्या निर्णयानंतर, टिकटॉक इंडियाचा महत्त्वपूर्ण खुलासा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

भारतीय वापरकर्त्यांचा तपशील चीनसह अन्य कोणत्याही देशाला दिलेला नाही, असे स्पष्टीकरण टिकटॉकतर्फे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने केलेल्या 59 अॅप बंद करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहोत, असेही टिकटॉक इंडियातर्फे सांगण्यात आले.

मुंबई : भारतीय वापरकर्त्यांचा तपशील चीनसह अन्य कोणत्याही देशाला दिलेला नाही, असे स्पष्टीकरण टिकटॉकतर्फे करण्यात आले आहे. केंद्र सरकारने केलेल्या 59 अॅप बंद करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहोत, असेही टिकटॉक इंडियातर्फे सांगण्यात आले.

ही बातमी वाचली का? कसं होणार MissionBeginAgain? निम्म्यांहून जास्त मुंबई कंटेन्मेंट झोनमध्ये 

केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 अॅपवर बंदी घालण्याबाबत काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी आम्हीही करत आहोत. यासंदर्भात सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी आम्हाला बोलावण्यात आले आहे, असे टिकटॉक इंडियाचे अध्यक्ष निखिल गांधी यांनी सांगितले. भारतीय कायद्यानुसार ग्राहकांच्या तपशिलाची गोपनीयता व सुरक्षिततेबाबतच्या सर्व नियमांचे आम्ही पालन केले आहे व यापुढेही करत राहणार आहोत. भारतातील वापरकर्त्यांचा कुठलाही तपशील आम्ही चीनसह कोणत्याही अन्य देशाच्या सरकारला दिलेला नाही आणि देणार नाही, असा खुलासा त्यांनी केला. 

ही बातमी वाचली का? वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

व्यवसायातील प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि गोपनीयता या सर्वोच्च तत्त्वांशी आम्ही बांधील आहोत. टिकटॉकतर्फे देशात 14 भारतीय भाषांमध्ये इंटरनेट आधारित सेवा उपलब्ध करून दिली. त्याद्वारे लक्षावधी भारतीय वापरकर्ते, कलाकार आदींना आपली कला सादर करण्याची संधी देऊन रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी बऱ्याच जणांनी तर पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर केला होता, असेही गांधी यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 59 Chinese app ban decisions, Important revelation of Tiktok India!