मुंबईत दिवसभरात दीड हजार नवे रूग्ण; 60 जणांचा मृत्यू

रूग्णवाढीचा दर दिवसेंदिवस घटत असल्याने मुंबईकरांना दिलासा
fight with corona
fight with coronae-sakal

मुंबई: शहरात रुग्णसंख्येचा घटता क्रम ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. आज रविवारी मुंबईत एकूण 1 हजार 544 नवे रुग्ण आढळले. त्यानुसार, आजपर्यंतची बाधित रुग्णांची एकूण संख्या 6 लाख 88 हजार 696 झाली. आज 2 हजार 438 रुग्ण बरे झाले. त्यामुळे, बरे झालेल्यांची संख्या 6 लाख 36 हजार 753 झाली. आज 60 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 14 हजार 260 झाली.

fight with corona
Video: विरारमध्ये हळदी समारंभात तुफान राडा

मुंबईत सध्या 35 हजार 702 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. सक्रिय रुग्णांची घटणारी संख्या दिलासादायक आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 92 टक्के आहे. कोविड रुग्णवाढीचा दर 0.29 टक्के आहे. रुग्णदुपटीचा कालावधी 231 दिवस झाला आहे. आतापर्यंत एकूण 58 लाख 98 हजार 605 चाचण्या झाल्या आहेत.

fight with corona
BJP च्या किरीट सोमय्यांचे थेट फूटपाथवर बसून आंदोलन

धारावीत कोरोना नियंत्रणात; दिवसभरात 8 नवे रुग्ण

लसीकरण आणि वाढत्या चाचण्यांमुळे धारावीत गेल्या काही दिवसांत धारावीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. धारावीत आज दिवसभरात 8 कोरोना रुग्ण सापडले असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजारवरून 478 वर पोहोचली आहे. धारावीत आतापर्यंत दुसऱ्या लाटेत आलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, दादरमध्ये आज 12 तर माहीममध्ये 32 रुग्ण आढळले.

fight with corona
"मराठा आरक्षणाचा खून काँग्रेस-राष्ट्रवादीने केला"

लसीकरण केंद्रात वाढ!

महापालिकेच्या जी-उत्तर विभागात येणाऱ्या दादर, माहीम आणि धारावीत सुरुवातीला माहीम मॅटर्निटी होम आणि ट्रान्सिट कॅम्प धारावी ही दोनच लसीकरण केंद्रे सुरुवातीला होती. लोकांमध्ये लसीकरणाबाबत जागृती केल्यानंतर लस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्या पार्श्वभूमीवर, अर्बन हेल्थ सेंटर-धारावी, श्री सिनेमा माहीम, कोहिनूर पार्किंग लॉट, सेंट मायकल चर्च-माहीम आणि माटुंगा लेबर कॅम्प येथे तातडीने लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com